एक्स्प्लोर

Happy Birthday Ashish Vidyarthi : मोठ्या पडद्यावर एक-दोन नव्हे तब्बल 150हून अधिक वेळा यमसदनी गेलेला लाडका खलनायक! वाचा अभिनेते आशीष विद्यार्थींबद्दल...

Happy Birthday Ashish Vidyarthi : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi ) आज (19 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

Ashish Vidyarthi Birthday : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi ) आज (19 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आशीष यांचा जन्म 19 जून 1962 रोजी केरळमधील कन्नूर येथे झाला.  आशीष यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यामुळे मोठं होऊन आपण अभिनेता बनायचं हे त्यांनी बालपणीच मनाशी पक्कं केलं होतं. आपल्या याच प्रवासाच्या दिशेने पुढे सरकण्यासाठी त्यांनी 1990मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेतला आणि आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले.

अभिनायचे शिक्षण घेत असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दिल्लीत राहून अनेक नाटके केली. त्यानंतर ते नव्या संधीच्या शोधात 1992 दरम्यान मुंबईत आले. बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांनी आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुन्हा कधीच थांबला नाही.

‘विठ्ठल काणीया’ला मिळाले विशेष प्रेम!

‘नाजायज’, ‘जीत’, ‘भाई’, ‘रेस’, ‘जिद्दी’, ‘मेजर साब’, ‘सोल्जर’, ‘हसीना मान जायेगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. पण, त्यांचे असे काही चित्रपट आले, ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यापैकीच एक म्हणजे 'वास्तव' हा चित्रपट! ‘वास्तव’ या चित्रपटात त्यांनी 'विठ्ठल काणीया' ही भूमिका साकारली होती, जी तुफान लोकप्रिय झाली.

तब्बल 150हून अधिक चित्रपटात साकारला खलनायक!

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आशीष विद्यार्थी नकारात्मक भूमिकेत दिसले आहेत. एक-दोन वेळा नव्हे तर, त्यांना आतापर्यंत तब्बल 150हून वेळा चित्रपटांमध्ये जीव गमवावा लागला आहे. अर्थात खलनायक म्हणून त्यांना यमसदनी जावे लागले आहे. मात्र, एका चित्रपटाच्या अशाच एका सीन दरम्यान त्यांचा जीव खरोखरच धोक्यात आला होता. ‘बॉलिवूड डायरी’ चित्रपटाचा सीन चालू होता. त्यात ते बुडत होते. ते खरोखरच बुडत होते, पण तिथल्या लोकांना वाटले की, ते केवळ अभिनय करत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने मोठ्या कष्टाने त्यांचे प्राण वाचवले.

हेही वाचा :

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!

महत्त्वाच्या बातम्या

Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget