Happy birthday Sangeeta Bijlani : पत्रिका छापल्या अन् सलमान खानसोबतचं लग्नच मोडलं! वाचा अभिनेत्री संगीता बिजलानीबद्दल...
Sangeeta Bijlani Birthday : सुप्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आज आपला 62वा वाढदिवस साजरा करत आहे.
Sangeeta Bijlani Birthday : 80-90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आज (9 जुलै) आपला 62वा वाढदिवस साजरा करत आहे. 1980मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर संगीताने 1988मध्ये ‘कातिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर तिने ‘त्रिदेव’, ‘हत्यार’, ‘अपराध’, ‘योद्धा’ आणि ‘लक्ष्मण रेखा’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या. संगीता बिजलानी जितकी तिच्या चित्रपटांमुळे ओळखली जाते, तितकीच तिचे सलमान खानसोबतचे (Salman Khan) नाते चर्चेत होते.
सलमान खान आणि संगीता बिजलानी यांनी 1986मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. दोघांचं नातं तब्बल 10 वर्ष टिकलं होतं. लवकरच त्यांचं लग्न देखील होणार होतं. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मार, त्याआधीच हे लग्न मोडलं. सलमानने आपली फसवणूक केली असं म्हणत संगीताने लग्न मोडलं होतं. याकाळात सलमान खान अभिनेत्री सोमी अलीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला होता. या चर्चा संगीतापर्यंत पोहोचल्या आणि तिने थेट हे लग्नचं मोडलं.
कशी झाली होती लव्हस्टोरी सुरु?
चित्रपट विश्वात येण्यापूर्वीच सलमान खानचं नाव संगीता बिजलानीसोबत जोडलं गेलं होतं. दोघांची पहिली भेट एका जीममध्ये झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागलं होतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी लवकरच लग्नबंधनातही अडकणार होती. मात्र, त्या आधीच हा संसार मोडला. स्वतः सलमान खान याने याचा खुलासा त्याच्या बायोग्राफीमध्ये केला होता.
सलमान खानच्या 'बीइंग सलमान' या पुस्तकात 27 मे 1994 रोजी दोघे लग्न करणार होते, असे नमूद करण्यात आले आहे. संगीतानेही एका मुलाखतीत सलमान खानसोबतचे लग्न करणार होते, ही गोष्ट मान्य केली होती, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. याशिवाय करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्येही सलमान खाननेही याचा उल्लेख केला होता. सलमानने सांगितले होते की, त्याचं लग्न होता होता राहिलं आहे.
क्रिकेटरशी बांधली लग्नगाठ
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संगीता बिजलानीने 1996मध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. मोहम्मद अझरुद्दीनने संगीतासोबत लग्न करण्यापूर्वी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. मात्र, लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनी त्यांचे नाते तुटले आणि 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या