Hanuman Trailer : 'हनुमान'चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज! इंडियन सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला तेजा सज्जा
Hanuman Movie : 'हनुमान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.
Hanuman Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Tejja Sajja) अभिनीत 'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'हनुमान'चा ट्रेलर आऊट! (Hanuman Trailer Out)
'हनुमान'चा ट्रेलर खूपच दमदार आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पौराणिक कथा आणि कल्पनांचं मिश्रण या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधील अनेक सीन्स प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहेत.
'हनुमान'च्या ट्रेलरमध्ये अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहेत. एकंदरीतच सिनेमाचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. बॅकग्राऊंडमधील संस्कृत श्लोक सिनेमाला शानदार बनवण्यात यशस्वी ठरले आहेत. तब्बल 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हनुमान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा देखील प्रशांत यांनी लिहिली आहे. तेलुगू, हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, स्पॅनिश, कोरियन, चिनी आणि जपानी अशा 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
'हनुमान' कधी होणार रिलीज? (Hanuman Release Date)
'हनुमान' या सिनेमात तेजा सज्जासह विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी, वेनेला किशोरसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अंजनदारी या काल्पनिक गावावर आधारित हा सिनेमा आहे. प्रशांत वर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. निरंजन रेड्डीने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
'हनुमान'चा टीझर काही दिवसांपूर्वी आऊट झाला. पण तेलुगू व्यतिरिक्त या टीझरची जास्त कुठे चर्चा नव्हती. आता ट्रेलरची मात्र जगभरात चर्चा सुरू आहे. प्रशांत वर्मा एक उत्सकृष्ट दिग्दर्शक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नेहमीच आपल्या गोष्टीने प्रशांत वर्मा यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'हनुमान' या सिनेमात तेजा सज्जा एका दलित व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. विनय राय या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या