Hanuman : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला फायदा; सिनेमाने कमावला कोट्यवधींचा गल्ला
Hanuman Movie Box Office Collection : 'हनुमान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे.
Hanuman Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या 'हनुमान'चा बोलबाला आहे. अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला फायदा झाला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे.
'हनुमान' 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
'हनुमान' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहे. रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने 150 कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. जगभरात हा सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. अंजनदारी या काल्पनिक गावावर आधारित हा सिनेमा आहे.
'हनुमान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.. (Hanuman Box Office Collection)
'हनुमान' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 8.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 12.45 कोटी, तिसऱ्या दिसशी 16 कोटी, चौथ्या दिवशी 15.2 कोटी, पाचव्या दिवशी 13.11 कोटी, सहाव्या दिवशी 11.34 कोटी, सातव्या दिवशी 9.5 कोटी, आठव्या दिवशी 10.5 कोटी, नवव्या दिवशी 14.6 कोटी आणि दहाव्या दिवशी 16.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने 130.95 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या दहा दिवसांत या सिनेमाने 170 कोटींची कमाई केली आहे.
पहिला दिवस : 8.5 कोटी
दुसरा दिवस : 12.45 कोटी
तिसरा दिवस : 16 कोटी
चौथा दिवस : 15.2 कोटी
पाचवा दिवस : 13.11 कोटी
सहावा दिवस : 11.34 कोटी
सातवा दिवस : 9.5 कोटी
आठवा दिवस : 10.5 कोटी
नववा दिवस : 14.6 कोटीट
दहावा दिवस : 16.50 कोटी
एकूण कमाई : 130.95 कोटी
View this post on Instagram
हनुमान या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नील वर्मा यांनी सांभाळली आहे. प्राइम शो एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. तेजा सज्जा मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमात वारालक्ष्मी सरतकुमार, विनय राय आणि अमृता अय्यर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हनुमानच्या निर्मात्यांनी राम मंदिरासाठी दान केले 2.6 कोटी रुपये
'हनुमान'च्या (Hanuman) निर्मात्यांनी राम मंदिरासाठी 2.6 कोटी रुपये दान केले आहेत. सिनेमाच्या प्रत्येक तिकीटातले पाच रुपये त्यांनी राम मंदिरासाठी दिले आहेत. परदेशातील सिनेप्रेक्षकांचीदेखील हनुमानने मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या