Love Shaadi Drama Trailer: हंसिका मोटवानीच्या लग्नातील किस्से पाहता येणार ओटीटीवर; 'लव्ह शादी ड्रामा' चा ट्रेलर पाहिलात?
हंसिका (Hansika motwani) आणि सोहेल यांच्या लग्नातील किस्से आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहेत. हंसिका आणि सोहेल यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित असणारी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Love Shaadi Drama Trailer: प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचा (Hansika motwani) विवाह सोहळा 4 डिसेंबर रोजी पार पडला. हंसिकाच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हंसिकानं बिझनेसमन सोहेल कथूरियासोबत (Sohail Khaturiya) लग्नगाठ बांधली. हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नातील काही किस्से आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहेत. हंसिका आणि सोहेल यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित असणारी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचं नाव 'लव्ह शादी ड्रामा' (Love Shaadi Drama) असं आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
'लव्ह शादी ड्रामा' चा ट्रेलर रिलीज
ट्रेलरमध्ये हंसिका मोटवानी तिच्या लग्नामध्ये घडलेल्या घटनांबद्दल सांगताना दिसत आहे. 'लव्ह शादी ड्रामा' च्या या ट्रेलरमध्ये हंसिकासोबतच सोहेलही त्यांच्या लग्नामध्ये घडलेले किस्से सांगताना दिसत आहेत. 'लव्ह शादी ड्रामा' चा हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हंसिकाचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'लव्ह शादी ड्रामा' कधी होणार रिलीज?
'लव्ह शादी ड्रामा' ही सीरिज 10 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. हंसिका आणि सोहेलचा विवाह सोहळा ज्या किल्ल्यामध्ये पार पडला, तो किल्ला 450 वर्ष जुना होता. हंसिकाच्या लग्नासाठी किल्ला खास सजावण्यात आला होता.
पाहा ट्रेलर
View this post on Instagram
हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 'शक लाका बूम बूम', 'सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे. या मालिकांच्या माध्यमातून हंसिका घराघरांत पोहोचली आहे. 'कोई मिल गया', 'आपका सरूर' आणि 'मनी है तो हनी' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
हंसिका ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. हंसिकाला अनेक नेटकरी इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तिचं युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलला 381K subscribers आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :