Films And Series On OTT: पठाण ते कोहरा, अॅक्शन आणि सस्पेन्सचा तडका; ओटीटीवरील हे चित्रपट आणि वेब सीरिज नक्की बघा
Films And Series On OTT: या वीकेंडला तुम्ही या अॅक्शन आणि सस्पेन्स असणाऱ्या सीरिज आणि चित्रपट पाहू शकता...
Films And Series On OTT: अनेकांना अॅक्शन सीन्स आणि सस्पेन्स असणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट बघायला आवडतात. ओटीटीवर अनेक जॉनर्सच्या वेब सीरिज आणि चित्रपट तुम्ही पाहू शकता. या वीकेंडला तुम्ही या अॅक्शन आणि सस्पेन्स असणाऱ्या सीरिज आणि चित्रपट पाहू शकता...
गन्स अँड गुलाब्स (Guns & Gulaabs- Netflix)
गन्स अँड गुलाब्स ही थ्रिलर वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. राजकुमार राव, दुल्कर सलमान, गुलशन देवैया, आदर्श गौरव आणि रजतव दत्ता यांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी ही वेब सीरिज ओटीटीवर रिलीज झाली. या वेब सीरिजमध्ये एका मेकॅनिकची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
View this post on Instagram
पठाण (Pathan- Prime Video)
अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होत. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना आवडले होते.
कोहरा (Kohra- Netflix)
नेटफ्लिक्सवरील ‘कोहरा’ ही अॅक्शन आणि थ्रिलर वेब सीरिज आहे. या वेब सीरिजची निर्मिती सुदीप शर्मा यांनी केली असून या वेब सीरिजचं दिग्दर्शन रणदीप झा यांनी केलं आहे.
View this post on Instagram
'सास बहू और फ्लेमिंगो' (Saas Bahu Flamingo- Disney + Hotstar)
'सास बहू और फ्लेमिंगो' या वेब सीरिजमध्ये डिंपल कपाडिय, आशिष वर्मा, वरुण मित्रा, उदित अरोरा, दीपक डोबरियाल आणि मोनिका डोगरा (Monica Dogra) या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ही वेब सीरिज तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
View this post on Instagram