एक्स्प्लोर
Advertisement
'गली बॉय'मुळे आपण 'ऑस्कर घेऊन येऊ'-झोया अख्तर
झोया अख्तर सध्या बरीच चर्चेत आहे. 'गली बॉय'ची निवड ऑस्करला झाल्यापासून तिची नुसती धावाधव सुरू आहे. त्यातच मुंबईत होणाऱ्या 'जिओ मामी' महोत्सवामध्ये ती ज्युरीही आहे. या संदर्भात तिने 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव मुलाखत दिली...
मुंबई: "आताचा हिंदी सिनेमा खूप बदलतोय. तो खूप सूक्ष्म होतो आहे. 'गली बॉय'ही तसाच होता. आता तर तो ऑस्करसाठी निवडला गेला आहे. पण, इतरही अनेक सिनेमे आहेत. त्यामुळे आम्ही तयारी करत आहोतच. तुम्हीही आमच्यासठी प्रार्थना करा. मला वाटतं यंदा आपण ऑस्कर घेऊन येऊ", अशा शब्दात दिग्दर्शक झोया अख्तरनं भारतीय सिनेमा आणि 'गली बॉय'ला ऑस्कर मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केला.
जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज 'मामि' महोत्सवाची पत्रकार परिषद झाली. यावेळी झोया अख्तर, विशाल भारद्वाज, अनुपमा चोप्रा, रोहन सिप्पी, आदित्य रॉय कपूर आदी मान्यवर उपस्थित होते. पण सगळ्यांच्या नजरा होत्या त्या झोयावर. झोयाने महोत्सवाची माहीती दिलीच, पण तिनेम 'गली बॉय'च्या निवडीबद्दलही आपली मतं मांडली.
'मामि'सारखा महोत्सव मुंबईत भरतोय ही खूप महत्वाची घटना आहे. त्यानिमित्ताने जगभरातले सिनेमे तुम्हाला पाहता येतात. मीही वेळात वेळ काढून हे सिनेमे पाहणार आहे, असंही झोयानं आवर्जून सांगितलं.
विजू खोटे यांना वाहिली श्रद्धांजली
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अभिनेते विजू खोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना झोया म्हणाली, खोटे यांना मी लहानपणीपासून पाहते आहे. 'शोले'मधली त्यांची कालिया ही भूमिका गाजली. इतर अनेक सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या जाण्यांनं दु:ख झालं आहेच. 'मामि'च्या सर्वच टीमकडून त्यांना श्रद्धांजली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement