Govinda Song Release : 'टिप टिप पाणी बरसा' गोविंदाचे नवे गाणे प्रदर्शित, 90 च्या दशकात घेऊन जाणारं गाणं
Tip Tip Paani Barsa Release : सुपरस्टार गोविंदाचे 'टिप टिप पाणी बरसा' हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.
Tip Tip Paani Barsa Release : 90 च्या दशकात अभिनयाने आणि नृत्याद्वारे प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदाने आता पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. गोविंदाने नुकतेच 'टिप टिप पाणी बरसा' हे नवे गाणे यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. 'गोविंदा रॉयल्स' नावाचे गोविंदाचे यूट्यूब चॅनल आहे.
प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी गोविंदाने डिजिटल माध्यमाचा अवलंब केला आहे. गाण्याद्वारे गोविंदा प्रेक्षकांना भेटणारच आहे. पण गाण्यात गोविंदाचा आवाजदेखील आहे. या गाण्यामुळे गोविंदाचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे गाणे प्रेक्षकांना पूर्वीच्या काळात घेऊन जाते.
या गाण्याबद्दल गोविंदा म्हणाला,"मला प्रेक्षकांचे मनोरंजन अनोख्या पद्धतीने करायचे होते. चाहत्यांनी आजवर माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच मी डिजिटल माध्यमावर गाणं प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे". याआधी 'द कपिल शर्मा' कार्यक्रमात गोविंदाने या गाण्यासंदर्भात माहिती दिली होती.
अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या 'सूर्यवंशी' सिनेमातून 'टिप टिप बरसा पाणी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे गाण्यातूनदेखील 90 च्या दशकात गेल्याचा भास होतो. हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सोशल मीडियावर 'टिप टिप बरसा पाणी' आणि गोविंदाच्या 'टिप टिप पाणी बरसा' गाण्याची तुलना करत आहेत.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi Release Date : Alia Bhatt चा' गंगूबाई काठियावाडी' आता 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Antim Film : सलमान खानने 'राहुलिया' म्हणत आयुष शर्माचा बीटीएस व्हिडीओ केला शेअर
थुकरट वाडीत देशमुख कुटुंबियांनी लावली हजेरी; श्रेया- भाऊ सिड आणि अदितीच्या भूमिकेत
Patralekhaa Wedding Saree : Patralekha च्या साडीवर बंगाली भाषेत लिहिला होता 'हा' संदेश, Rajkummar Rao ने केले पत्रलेखाचे कौतुक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha