Google Most Searched Asians 2022 : आलिया, दीपिका पडल्या मागे, Katrina Kaif ठरली सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री
Katrina Kaif : 'मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने बाजी मारली आहे.
Katrina Kaif Google Most Searched Asians 2022 : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. नुकतीच गूगलने 'मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022' (Google Most Searched Asians 2022) ही यादी जाहीर केली आहे. आता या यादीत कतरिनाने बाजी मारली आहे.
गूगलने जाहीर केलेल्या 'मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022' या यादीत कतरिना कैफ चौथ्या नंबरावर आहे. कतरिनाने आलिया भट्ट (Alia Bhatt), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) या आघाडीच्या अभिनेत्रींनादेखील मागे टाकलं आहे.
Most searched Asians on Google 2022: Katrina Kaif beats Alia Bhatt, Deepika Padukone
— ANI Digital (@ani_digital) December 15, 2022
Read @ANI Story | https://t.co/9wMBZecqDw#KatrinaKaif #AliaBhatt #DeepikaPadukone #Bollywood pic.twitter.com/DtyWrLmsMF
'मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022'मध्ये पहिल्या क्रमांकावर कोरियाइ बॅंड BTS V आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जंगकुक आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आहे. चौथ्या नंबरावर कतरिना कैफ आहे. तर आलिया भट्ट पाचव्या क्रमांकावर आहे.
कतरिना अभिनयासह 'के ब्यूटी' या तिच्या व्यवसायामुळेदेखील चर्चेत असते. आज कतरिना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. परदेशात लहानाची मोठी झालेल्या कतरिनाने 'बुम' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. पण 2005 साली प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार क्यू किया' (Maine Pyaar Kyun Kiya) या सिनेमाने कतरिनाचं नशीब बदललं.
View this post on Instagram
'नमस्ते लंडन', 'मेरे ब्रदर की दुल्हनिया', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'राजनिती', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'एक था टायगर', 'बँग बँग', 'टायगर जिंदा है', 'सुर्यवंशी' यांसारखे अनेक सिनेमे कतरिनाने दिले आहेत. अभिनेता सलमान खान आणि कतरिनाच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.
कतरिनाचे आगामी सिनेमे
कतरिनाने 'फोन भूत' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या भयपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करताना कतरिना दिसून आली होती. सध्या कतरिनाचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. कतरिनाचे 'टायगर 3', 'मेरी क्रिसमस' आणि 'जी ले जरा' हे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या