Goodbye Box Office Day 1: रश्मिका अन् बिग बींच्या 'गुडबाय' ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'गुडबाय' (Goodbye) या चित्रपटामधून रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...
Goodbye Box Office Day 1: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री रश्मिका मंदन्ना (Rashmika Mandanna) यांचा 'गुडबाय' (Goodbye) हा चित्रपट काल (7 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात बिग बी आणि रश्मिका यांच्यासोबतच नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधून रश्मिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...
'गुडबाय' चित्रपटाचं कलेक्शन
रिपोर्टनुसार, 'गुडबाय' या चित्रपटानं पहिल्या दिवशी जवळपास 1.50 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करु शकतो, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
रश्मिकानं या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकरली आहे. या बाप-लेकीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या विक्रम वेधा या चित्रपटासोबत आणि 'पोन्नियिन सेलवन' या दोन चित्रपटांची गुडबायसोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. 'पोन्नियिन सेलवन'नं जगभरात जवळपास 300 कोटींची कमाई केली आहे. तर विक्रम वेधा हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवू शकला नाही. गुडबाय हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.
हिंदुस्तानी भाऊने केली चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी
हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत 'गुडबाय' सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊ म्हणाला, भारतीय सैन्यदल आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं गरजेचं आहे. धर्माची चेष्टा-मस्करी करणाऱ्या सर्व गोष्टींना आपण बायकॉट केलं आहे. त्याचप्रमाणे सैन्य, पोलिस यांची जर कोणी मस्करी करत असेल तर मी त्यांना सोडणार नाही. आज त्यांच्यामुळे आपण सण साजरे करू शकतो". हिंदुस्तानी भाऊचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे #boycottgoodbye देखील ट्रेडिंगमध्ये आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: