(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Godavari Movie : ऑस्करच्या शर्यतीत मराठीतील 'गोदावरी' सिनेमाचा समावेश, जितेंद्र जोशीला बोर्डात प्रथम आल्याची भावना
'कूळंगल' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत आहे. तर ऑस्करच्या शर्यतीत गोदावरी सिनेमाची निवड झाल्याने अभिनेता जितेंद्र जोशीने बोर्डात आल्याची भावना व्यक्त केली आहे.
Godavari Movie : जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) ने निर्मिती केलेला गोदवरी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला होता. त्यानिमित्ताने जितेंद्रने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हटके पोस्टदेखील लिहिली आहे. गोदावरी सिनेमा येत्या 3 डिसेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. गोदावरी सिनेमाचे आंतरराष्ट्रीय समीक्षणदेखील करण्यात आले होते. सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाने सातासमुद्रापार मजल मारली आहे.
जितेंद्र जोशी ने सोशल मीडियावर सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल लिहिले आहे, बोर्डाच्या परिक्षेत देशात. राज्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या फोटोसोबत विशेष प्राविण्य मिळालेल्या, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्याचंदेखील नाव वर्तमानपत्रात छापून येतं. तेव्हा ते वाचून त्याच्या पालकांना आणि मित्र मैत्रिणींना आनंद होतो. कारण अभ्यास त्यानेदेखील केलेला असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो विद्यार्थी जिथे राहतो त्या विभागात, गल्लीत, सोसायटीत सर्वांच्या आनंदात आनंदाला उधाण येतं. कारण ते त्याला अभ्यास करायला मदत करतात. सर्व जणं मिळून आनंद साजरा करतात आणि पुढे अभ्यास सुरू होतो".
जितेंद्रने पुढे लिहिले आहे, गोदावरी पहिला प्रयत्न, पहिला चित्रपट आणि थेट ऑक्करच्या पहिल्या शर्यतीत पोहोचला. 'कूळंगल' सिनेमाचे अभिनंदन तसेच गोदावरीच्या संपूर्ण संघाचं अभिनंदन. जितेंद्रच्या या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारदेखील जितेंद्रचे कौतुक करताना दिसून येत आहे.
गोदावरी सिनेमाची गेले अनेक दिवस सिने वर्तुळात चर्चा होत होती. मराठीतीत एक उत्तम अभिनेता जितेंद्र जोशी आतापर्यंत नाटक, सिनेमा, मालिका, वेब मालिकांमध्ये अभिनय करताना दिसून आला आहे. तर तो उत्तम लेखक देखील आहे. त्याने अनेक कविता देखील लिहिलेल्या आहेत. त्याच्या कवितांसाठी त्याचा चाहतावर्ग त्याला तुफान प्रतिसाद देत असतो. आता या सगळ्या भूमिका पार केल्यानंतर या अवलियाने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले आहे. लवरकच त्याने प्रदर्शित केलेला गोदावरी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती ब्लूयू ड्रॉप फिल्मस आणि जितेंद्र जोशी यांनी केली आहे. जितेंद्र जोशी, नीणा कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोकले या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. संगीत देवबाभळी या प्रायोगिक नाटकानंतर त्याचे प्रसाद कांबळींनी व्यावसासिक नाटकात रुपांतर केले होते. या नाटकाने प्रचंड यश मिळवले होते. या नाटकाचे लेखन केलेल्या प्राजक्त देशमुखनेच गोदावरी सिनेमाचेदेखील लेखन केले आहे. सिनेमालिखानासाठी निखिल महाजनची साथ मिळाली आहे.