एक्स्प्लोर

Gina Lollobrigida: 'जगातील सर्वात सुंदर महिला' जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gina Lollobrigida: जीना या 50 आणि 60 के दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी वयाच्या  95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Gina Lollobrigida: प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांचे निधन झाले आहे. जीना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्या अभिनेत्री आणि फोटो जर्नलिस्ट  होत्या. जीना लोलोब्रिगिडा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवली.  जीना यांनी वयाच्या   95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  जीना या 50 आणि 60 के दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रिपोर्टनुसार,  काही महिन्यांपूर्वी  जीना यांच्या मांडीचे हाड मोडले होते. मग ते ठीक करण्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, त्यानंतर लगेच जीना चालायला लागल्या होत्या. 

4 जुलै 1927 रोजी जीना यांचा जन्म झाला. त्यांना तीन बहिणी होत्या.   जीना यांचे टोपणनाव लोलो असं होते. जीना यांनी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. त्यानंतर त्यांनी 'ब्लॅक ईगल', 'कम सप्टेंबर', 'ट्रेपीज',  'अलार्म बेल्स', 'बीट द डेविल', 'बुओना सेरा' आणि 'मॅड अबाउट ओपेरा' या चित्रपटांमध्ये काम केले. 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रेड, लव्ह अँड ड्रिम्स या चित्रपटामुळे जीना यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या The Hunchback of Notre Dame या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं.  1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या Beat the Devil या चित्रपटामध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. 

1969 मध्ये जीना यांनी 'डेविड डी डोनाटेलो अवॉर्ड'  जिंकला होता. 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या La Donna Piu Bella del Mondo या चित्रपटामुळे त्यांना 'जगातील सर्वात सुंदर महिला' अशी ओळख मिळाली. जीना यांनी काही काळ फोटो जर्नलिस्ट म्हणून देखील काम केलं होतं.  1961 मध्ये जीना लोलोब्रिगिडा यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांना तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कारसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. फाल्कन क्रेस्ट, द लव्ह बोट, वुमन ऑफ रोम या मालिकामध्ये देखील जीना यांनी काम केले. 

 गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन जीना यांचा फोटो शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 17 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget