Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज
Gehraiyaan : दीपिका पदुकोणच्या 'गेहरांईया' सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित झाले आहे.
![Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज Gehraiyaan Title Track Explores The Depths Of Love And Choices Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/d4c382bc229379440825d19df4eef409_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gehraiyaan : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा (Siddhant Chaturvedi) 'गेहरांईया' (Gehraiyaan) सिनेमा सध्या चर्चेत आहे. अशातच निर्मात्यांनी टायटल साँग प्रदर्शित केले आहे. हे टायटल साँग सध्या धुमाकूळ घालत आहे.
'तू मर्ज हैं दवा भी, पर आदत है हमें, रोका हैं खुद को लेकिन हम रह ना सके' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला एका तासाच एक मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं गीतकार अंकुर तिवारी यांनी लिहिले आहे. तर गायिका लोथिकाने हे गाणं गायलं आहे. दीपिकाचा हा ओटीटीवरचा पहिला सिनेमा आहे.
View this post on Instagram
'गेहरांईया'चं टायटल सॉंग हे 'फ्रंटलाइन' या मूळ गाण्याचे हिंदी रूपांतर आहे. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
संबंधित बातम्या
Shabana Azmi Corona Positive : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : कधीकाळी बेरोजगार असणारा 'जेठालाल' आज आहे इतक्या संपत्तीचा मालक
Kapil Sharma : नेटफ्लिक्सच्या 'कॉमेडी शो' चं नाव असं ठरलं; कपिलनं सांगितला किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)