एक्स्प्लोर

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Gautami Patil : सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत आहे. पण आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातारा (Satara) न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी महाराष्ट्रालील गावागावांतील सर्वच तरुणांना भूरळ घातली आहे. पण दुसरीकडे गौतमीच्या नृत्याने काही महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. लावणी ही लोककला आहे. लोककलेत अश्लिलता येत नाही. लावणीकडे बघण्याचा समाजातील महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी, लावणी सादर करताना त्यात अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर अनेकदा टीका करण्यात आली आहे. 

गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मंडळींसह लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील गौतमीवर टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. 

गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर! (Gautami Patil Movie)

गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. पण लवकरच ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'घुंगरु' असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रातील विविध गावांसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी नक्की कोणतं पात्र साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

गौतमी पाटील कोण आहे? (Who Is Gautami Patil)

गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. 26 वर्षीय गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. एका कार्यक्रमासाठी गौतमी चांगलच मानधन घेते. गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. 

संबंधित बातम्या

Pune gautami patil : गौतमी पाटीलचा निमगाव केतकीतील लावणीचा कार्यक्रम रद्द; गावकऱ्यांनी कार्यक्रमासाठी जागाच दिली नाही

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget