KGF2 ते Brahmastra पर्यंत 'हे' सात बिग बजेट सिनेमे 2022 मध्ये होणार प्रदर्शित
Bollywood Movies : कोरोनामुळे अनेक बड्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
These big films to be released in 2022 : गेल्या अनेक दिवसांत काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्मात्यांनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रेक्षक सध्या अनेक बिग बजेट सिनेमांची प्रतीक्षा करत आहेत.
आरआरआर (RRR) : एस. एस. राजामौलींच्या आरआरआर सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात राम चरण, एनटीआर ज्युनियर, अजय देवगण आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 7 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अद्याप सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.
केजीएफ 2 (KGF2) : 'केजीएफ' सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रेक्षक आता 'केजीएफ' च्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. प्रशांत नीलने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. संजय दत्त आणि रवीना टंडन देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
ब्रह्मास्त्र (Brahmastra) : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत आहेत. अयान मुखर्जीच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 9 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) : दिग्दर्शक अद्वैत चंदनच्या या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे.
भेडिया (Bhediya) : अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन, कृती सेनन आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होत आहे.
पृथ्वीराज (Prithviraj) : दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज सिनेमात अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट यावर्षी 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
धाकड (Dhakad) : या चित्रपटात कंगना रनौतसोबत अर्जुन रामपाल दिसणार आहे. या सिनेमाचीदेखील प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. पण हा सिनेमा आता 8 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Badhaai Do Trailer : समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणी मांडणारा 'बधाई दो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर झाला प्रदर्शित
Kangana Ranaut : ...म्हणून साऊथ स्टार लोकप्रिय; कंगनानं सांगितली कारणं
Money Heist चा जगभरात डंका; नेटफ्लिक्सवर 670 कोटी तास पाहण्यात आलेली सीरिज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha