Jignesh Mehta : मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध एफआयआर दाखल!
Jignesh Mehta : अभिनेत्री-मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध (Jignesh Mehta) अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jignesh Mehta : मनोरंजन विश्वात आपले नशीब आजमवण्यासाठी आलेल्या एका अभिनेत्री-मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध (Jignesh Mehta) अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 354 (विनयभंग किंवा अपमान करण्याच्या हेतूने महिलेवर हल्ला किंवा बळजबरी करणे), 354B आणि 506 (धमकी देणे) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज (6 ऑगस्ट) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
Mumbai | FIR registered against stock broker Jignesh Mehta at MIDC PS for allegedly molesting a model. IPC Sections 354 (assault or criminal force to woman with intent to outrage her modesty), 354B & 506 (criminal intimidation) invoked. He will be produced before the Court today.
— ANI (@ANI) August 6, 2022
नेमकं प्रकरण काय?
जिग्नेश मेहताने पीडितेला मुंबईत येऊन भेटण्यास सांगितले होते. सादर पीडितेला जिग्नेश अंधेरी एमआयडीसीमधील एका हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताने आपण अनेक बॉलिवूड निर्मात्यांना ओळखतो आणि तुला चित्रपटात काम मिळवून देऊ, असे वचन देऊन शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी एका हॉटेलच्या खोलीत नेले. जेवणाचे निमित्त करत हॉटेलमध्ये नेलेल्या जिग्नेश मेहताने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
हॉटेल कर्मचार्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात
घाबरलेल्या पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून हॉटेलचे कर्मचारी जमा झाले आणि या कर्मचार्यांनी तिला वाचवले. तसेच, त्यांनी जिग्नेश मेहताला पकडून अंधेरीतील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी जिग्नेश मेहता विरोधात एफआयआर दाखल केला असून, त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्यावर कलम 354, 354B बी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
