एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चित्रपटाचा प्रीव्ह्यू पाहून 29 वर्षीय निर्मात्याची आत्महत्या
कोलम : 29 वर्षीय मल्ल्याळम चित्रपट निर्माते अजय कृष्णन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कोलममधील तिरुमुल्लावरममधल्या निवासस्थानी शनिवारी रात्री अजय यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज मांडला आहे.
आर्थिक कारणांमुळे अजय यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 'अवरुदे रावुकल' या आगामी चित्रपटाची निर्मिती अजय यांनी केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चित्रपटाचा प्रिव्ह्यू पाहिला होता. चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत अजय चिंताग्रस्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपली ही चिंता अजय यांनी पालकांकडेही व्यक्त केल्याची माहिती आहे.
अजय यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत राहत्या घरी आढळून आला. त्यावेळी त्यांचे आई-वडीलही घरीच होते. अजय यांची ही पहिलीच चित्रपट निर्मिती होती. पहिल्याच कलाकृतीवर त्यांनी 4 कोटी रुपये खर्च केल्याचं अजय यांच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं आहे. अजय यांना एक विवाहित बहिण असून ती परदेशात राहते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
निवडणूक
Advertisement