Fighter Poster Out : 'फायटर' सिनेमातील अनिल कपूरचा धमाकेदार लूक आऊट! कमांडिग ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार अभिनेता
Anil Kapoor : 'फायटर' (Fighter) या बहुचर्चित सिनेमातील अनिल कपूरचा लूक आता आऊट झाला आहे.
Anil Kapoor Fighter Poster Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आगामी 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा सिनेमा ट्रेंडिगमध्ये आहे. आता या सिनेमातील अभिनेता अनिल कपूरचा (Anil Kapoor) धमाकेदार लूक आऊट झाला आहे.
बॉलिवूडचा 'मिस्टर इंडिया' अनिल कपूर सध्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. या सिनेमातील अनिल कपूरच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'फायटर'मधील अनिल कपूरचा फर्स्ट लूक आऊट! (Anil Kapoor Fighter Poster Out)
'फायटर' या सिनेमातील अनिल कपूरचा (Anil Kapoor) फर्स्ट लूक आऊट झाला आहे. 'फायटर' या सिनेमात अनिल कपूर कॅप्टन जय सिंह उर्फ रॉकीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्याला दमदार आणि जबरदस्त लूक आता समोर आला आहे. अनिल कपूरने फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'फायटर' कधी प्रदर्शित होणार? (Fighter Release Date)
'फायटर' या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) सांभाळणार आहे. या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अनिल कपूरच्या या सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
View this post on Instagram
अनिल कपूर यांच्याबद्दल जाणून घ्या.. (Who is Anil Kapoor)
अनिल कपूर हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 40 वर्षांपेक्षा अधिकच्या सिनेप्रवासात त्यांनी 100 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. उमेश मेहरा यांच्या 'हमारे तुम्हारे' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनिल कपूर यांना कर्मा, मिस्टर इंडिया, तेजाब, राम लखन सारख्या सिनेमांमुळे खऱ्या अर्थाने स्टारडम मिळालं आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या