Fardeen Khan Comeback Heeramandi : ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत, 12 वर्षात 19 फ्लॉप सिनेमे; आता 14 वर्षानंतर अभिनेता करतोय कमबॅक
Fardeen Khan Comeback Heeramandi : निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी: द डायमंड बाजार'ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजमधून तब्बल 14 वर्षानंतर अभिनेता फरदीन खान कमबॅक करत आहे.
Fardeen Khan Comeback Heeramandi : बॉलिवूडमध्ये अनेकजण नशीब आजमावण्यास येतात. काहीजण या ग्लॅमरस जगतात यशस्वी होतात. तर, काहीजणांचा संघर्ष कायम सुरू असतो. तर अनेकजण परतीचा मार्ग पकडून या रुपेरी पडद्याच्या जगातून माघार घेतात. तर, काहीजण सेकंड इनिंगसाठी पुन्हा कमबॅक करतात. स्टार किड्सबाबतही असे होते. जवळपास 14 वर्षानंतर बॉलिवूडमधील अभिनेता आता कमबॅक करतोय. ओटीटीच्या माध्यमातून कमबॅक करणारा अभिनेता हा फरदीन खान (Fardeen Khan) आहे. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो असलेल्या फरदीनची फिल्मी कारकिर्द तशी फारशी यशस्वी ठरली नव्हती.
निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी: द डायमंड बाजार'ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 1 मे रोजी ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. या वेब सीरीजसोबत फरदीन खानही पुन्हा चर्चेत आला आहे. या वेब सीरिजमधील फरदीन खानचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला. सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वेब सीरिजमधील अभिनेत्यांच्या फर्स्ट लूकचा पोस्टर शेअर केला आहे. यात अभिनेते ताहा शाह बदुशा, शेखर सुमन आणि अध्यायन सुमन देखील आहेत. या कलाकारांचा लूक पाहण्यासारखा आहे. पोस्टर समोर आल्यानंतर चाहत्यांना फरदीन खानबद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे. यामध्ये तो अली मोहम्मदची भूमिका साकारणार आहे.
फरदीन खान हा 2010 मधील 'दुल्हा मिल गया' या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता 14 वर्षानंतर फरदीन कमबॅक करत आहे.
View this post on Instagram
1998 मध्ये पदार्पण, 19 फ्लॉप चित्रपट
फरदीन खानने बॉलिवूडमध्ये 1998 साली 'प्रेम अगन' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन फरदीनचे वडील आणि बॉलिवूडमधील अभिनेते, दिग्दर्शक फिरोज खान यांनी केले होते. मात्र, तिकीटबारीवर हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर राम गोपाल वर्माचा जंगल, प्यार तुने क्या किया या चित्रपटातही फरदीन झळकला. मात्र, तिकीटबारीवर हे चित्रपट फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
फरदीनचे लव्ह के लिए साला कुछ भी करेगा, हे बेबी, नो एन्ट्री सारखे मल्टिस्टारर चित्रपट यशस्वी झाले. मात्र, त्याचा मुख्य भूमिका असलेले चित्रपट चमक दाखवू शकले नाहीत. गोविंद निहलानी यांच्या 'देव' या चित्रपटात त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 2010 मधील 'दुल्हा मिल गया' या चित्रपटानंतर फरदीनने बॉलिवूडमधील अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली.
ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत
2001 मध्ये फरदीन खानला कोकेन खरेदी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने फरदीनसह आणखी काहीजणांना अटक केली होती. फरदीनजवळ एक ग्रॅमपेक्षा कमी कोकेन आढळले होते. त्याच्याविरोधात NDPS कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अडकल्यानंतर फरदीनने शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले. त्याशिवाय, कोर्टाकडे या प्रकरणात नियमांच्या आधारे सुटका करण्याची विनंती केली होती. 2012 मध्ये फरदीन खानला मुंबई सत्र न्यायालयाने अंमली पदार्थ बाळगण्याच्या आरोपातून दोषमुक्त करण्यात आले होते.