Farah Khan Revelation : 'तो डायरेक्टर येऊन माझ्या बेडवर बसला...', फराह खानचा धक्कादायक खुलासा; बॉलिवूडच्या अफेअर्सवरही बोलली
Farah khan: फराहने सांगितले की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका मोठ्या दिग्दर्शकाची तिच्यावर वाईट नजर होती आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.

Farah Khan: बॉलीवूडची दुनियेचा झगमगट अनेकांना खिळवून ठेवतो पण या झगमगटामागे अनेकांना चांगले वाईट अनुभव येतात. याला बॉलीवूडचे बडे कलाकारही अपवाद नाहीत. बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे कायम चर्चेत राहते. नुकतीच ती काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच शो’मध्ये दिसली, जिथे तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला. फराहने सांगितले की, तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका मोठ्या दिग्दर्शकाची तिच्यावर वाईट नजर होती आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. (Bollywood News)
मी रूमवर गेले अन् वातावरणच बदललं...
फराह म्हणाली, “तो काळ असा होता की मी इंडस्ट्रीत नवी होते आणि प्रत्येक संधी गांभीर्याने घेत होते. एकदा एका दिग्दर्शकाने मला स्क्रिप्टवर चर्चा करायची आहे असं सांगितलं. मी त्याच्या हॉटेल रूममध्ये गेले, पण आत गेल्यानंतर सगळं वातावरणच बदललं.” फराहच्या म्हणण्यानुसार, तो तिच्या बेडवर बसण्याचा प्रयत्न करू लागला. “मला तेव्हा स्वतःची रक्षा करावी लागली आणि मी त्याला लाथ मारून बाहेर काढलं,” ती म्हणाली.
सेटवरील अफेअर्सवर म्हणाली...
या घटनेचा उल्लेख करताना फराहने सांगितले की, त्या काळात ती इंडस्ट्रीत नवीन होती आणि अशा अनेक गोष्टी तिला झेलाव्या लागल्या. ती म्हणाली, “त्या काळात सेटवर अफेअर्स होणं खूप कॉमन होतं. मला आधी समजत नव्हतं की लोक सेटवर इतका वेळ कसा घालवतात, पण नंतर लक्षात आलं की बरेच जण तिथे अफेअरमध्ये गुंतलेले असतात.” फराहने या दरम्यान बोमन ईरानी आणि संजय लीला भन्साळीबद्दलही बोलताना सांगितले की, या दोघांनी तिच्या करिअरच्या सुरुवातीला नेहमी साथ दिली. “भन्साळी माझ्या घरी आले आणि म्हणाले की ते नेहमी माझ्या पाठीशी असतील,” ती म्हणाली.
तिने आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ‘तीस मार खां’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. फराह म्हणाली, “या चित्रपटाने 15 वर्षांपूर्वी 65 कोटींची कमाई केली होती. आजही लोक विचारतात की कोणत्या चित्रपटाचा सिक्वेल व्हावा, तर ‘तीस मार खां’चं नाव घेतात.”शोमध्ये ट्विंकलने जेव्हा विचारलं की, “या चित्रपटाचा दुसरा भाग झाला तर कोण काम करेल?”, तेव्हा अनन्या पांडे लगेच म्हणाली, “मी करू शकते का?” फराहने हसत उत्तर दिलं, “हो, तू कॅटरीना कैफची छोटी बहीण बनून ये.”
मला त्याला हाकलून द्यावे लागले..
शेवटी फराहने ट्विंकलला सांगितलं, “त्या काळात मी खूप ‘हॉट’ दिसायचे. एका दिग्दर्शकाने शूटिंगदरम्यान माझ्यावर वाईट नजर ठेवली होती. नंतर तो माझ्या रूममध्ये गाण्यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने आला आणि बेडवर बसला. मला त्याला हाकलून द्यावे लागले. तो माझ्या मागेच लागला होता.” फराहचा हा खुलासा ऐकून सगळे थक्क झाले आणि तिच्या धैर्याचं कौतुकही झालं.
























