Swara Bhasker Husband: फहादनं 'भाई' म्हणत स्वराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; नेटकरी म्हणाले, 'देव असे भाऊ बहिण...'
काल स्वराचा (Swara Bhasker) 35 वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त फहादनं (Fahad Ahmad) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
Swara Bhasker Husband: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) विवाहबद्ध झाली. 16 फेब्रुवारीला स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले. काल स्वराचा 35 वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त फहादनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
फहादनं ट्विटरवर स्वरासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा भाई, तुझ्यासारखी मैत्रिण आणि मार्गदर्शक मिळाल्यामुळे मला धन्य झाल्यासारखं वाटत आहे. भाई जेंडर न्यूट्रल आहे.'
Many many happy returns of the day bhai, listening to your suggestion on my birthday I am married, I hope u get to know from twitter🙈
— Fahad Ahmad (@FahadZirarAhmad) April 9, 2023
Thank you for completing me in every aspect,m blessed to have a friend and mentor like u😘
I love you my heart❤️
P.S-bhai is gender neutral pic.twitter.com/Rp7uTzKR9q
फहादच्या ट्वीटला नेटकऱ्यांच्या कमेंट्स
फहादच्या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आम्हाला आधीपासूनच माहित होतं की, ती भाई आहे. तुला आता काळालं त्याचा आम्हाला आनंद होत आहे.' दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'यात भाई कोण आहे?' तर 'देवा असे भाऊ-बहिणी कुणालाही देऊ नये'
फहादनं स्वराच्या वाढदिवसाला आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये फहाद आणि स्वराचे काही खास फोटो दिसत आहेत.
View this post on Instagram
स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.'
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या इतर बातम्या:
Fahad Ahmad: स्वराच्या पतीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाला, "हिंदू-मुस्लिम..."
'