एक्स्प्लोर

Esmayeel Shroff: दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन; अनेक हिट चित्रपटांचे केले होते दिग्दर्शन

इस्माईल श्रॉफ (Esmayeel Shroff) यांनी अनेक हिट आणि लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांचे काल (26 ऑक्टोबर) निधन झाले.

Esmayeel Shroff:  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ (Esmayeel Shroff) यांचे काल (26 ऑक्टोबर) मुंबईत निधन झाले.  इस्माईल श्रॉफ यांनी आहिस्ता आहिस्ता, थोडी सी बेवफाई, बुलंदी, सुर्या, गॉड अँड गन, पोलीस पब्लिक, निश्चय, तरकीब, मझदर यांसारखे अनेक हिट आणि लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केले होते. इस्माईल श्रॉफ यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

सुपरस्टार्सच्या चित्रपटांचे केले दिग्दर्शन

इस्माईल श्रॉफ यांनी प्रसिद्ध अभिनेते राजकुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर ते सलमान खान अशा अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट दिग्दर्शित केले होते.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केलं काम
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी इस्माईल श्रॉफ यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ध्वनी अभियांत्रिकीचा कोर्स केला. त्यानंतर चित्रपटात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. साधू और शैतान या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 2004 साली प्रदर्शित झालेला 'थोडा तुम बदलो थोडा हम' हा त्यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट होता. इस्माईल श्रॉफ यांनी जळपास 15 चित्रपटांचे दिग्दर्शन केलं.  'थोड़ी सी बेवफाई' या चित्रपटांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

एबीपी न्यूजला माहिती देताना मुलगा फहाद खानने सांगितले की, 29 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील इस्माईल श्रॉफ यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे निकामी झाला होता आणि त्यांना चालता येत नव्हते.  

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले होते. परंतु आज सकाळी 6.40 वाजता इस्माईल श्रॉफ हे त्यांच्या अंधेरी येथील घरी जमिनीवर कोसळले, त्यानंतर त्यांना पुन्हा अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. 

एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितलं की, 'त्याच्या 'थोडीसी बेवफाई' आणि 'आहिस्ता आहिस्ता' या चित्रपटांमध्ये मी काम केले. आहिस्ता आहिस्ता हा चित्रपट माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. त्यांचा स्वभाव कडक होता पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं.  ते अतिशय संवेदनशील दिग्दर्शक होते.त्यांनी इंडस्ट्रीत आपली छाप सोडली आहे.'  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 27 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget