एक्स्प्लोर
अभिनेत्री इशा देओल पुन्हा आई झाली
अभिनेत्री इशा देओल आणि भरत तख्तानी यांना दहा जून रोजी मुलगी झाली. त्यांनी आपल्या मुलीचं मिराया असं नामकरण केलं आहे

मुंबई : अभिनेत्री इशा देओल हिला पुन्हा मातृत्वसुख लाभलं आहे. दहा जून रोजी इशा आणि पती भरत तख्तानी यांना मुलगी झाली. इन्स्टाग्रामवरुन इशाने लेकीच्या जन्माची घोषणा करताना तिचं नाव 'मिराया' ठेवल्याचं सांगितलं. जानेवारी महिन्यात इशाने आपण पुन्हा प्रेग्नंट असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. इशाने तिची मोठी मुलगी राध्याचा फोटो शेअर केला होता. 'माझं आता मोठी बहीण म्हणून प्रमोशन झालंय' असं लिहिलेल्या एका सोफ्याशेजारी ती उभी असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. मिरायाच्या जन्मामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हेमा मालिनी यांनीही नातीच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त केला आहे. इशाची मोठी मुलगी राध्याचा जन्म 24 ऑक्टोबर 2017 रोजी झाला होता. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर फेब्रुवारी 2012 मध्ये इशा आणि बिझनेसमन भरत तख्तानी यांनी साखरपुडा केला. तर जून 2012 मध्ये ते दोघं विवाहबंधनात अडकले होते.
इशा केकवॉक या शॉर्टफिल्ममध्ये शेफची भूमिका साकारत आहे. इशा देओल 2015 पासून चित्रपटसृष्टीपासून तशी दूरच राहिली आहे. 2002 मध्ये ‘कोई मेरे दिल से पूंछे’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इशाची भूमिका असलेले युवा, धूम, काल, दस, नो एन्ट्री यासारखे चित्रपट गाजले आहेत.View this post on Instagram
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























