KKK 13: खतरों के खिलाडी 13 मध्ये खतरनाक स्टंट करणार 'हे' स्पर्धक, 'या' 5 कारणांमुळे रोहित शेट्टीचा शो होणार सुपरहिट?

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Jun 2023 05:24 PM
Maharashtra Television News :तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात... Read More
KKK 13: खतरों के खिलाडी 13 मध्ये खतरनाक स्टंट करणार 'हे' स्पर्धक, 'या' 5 कारणांमुळे रोहित शेट्टीचा शो होणार सुपरहिट?
KKK13:  खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा यंदाचा सीझन या पाच कारणांमुळे खास असणार आहे. जाणून घेऊयात ती करणे... Read More
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे.  Read More
अरुंधती परत आल्याने सगळ्यांना झाला आनंद; 'आई कुठे काय करते !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
नुकताच 'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती ही अशुतोषचे आभार मानताना दिसत आहे.  Read More
Scoop: 'स्कूप' सीरिजमधील जागृती पाठक या भूमिकेसाठी करिश्मा तन्नाची निवड का केली? हंसल मेहता म्हणाले...
स्कूप (Scoop) या वेब सीरिजमधील  जागृती पाठक या भूमिकेसाठी करिश्मा तन्नाची निवड का केली?  या प्रश्नाचं उत्तर एका मुलाखतीमध्ये हंसल मेहता यांनी दिलं आहे.  Read More
Adipurush: ओम राऊतनं क्रितीला केलेल्या 'गुडबाय किस' मुळे वाद; सोशल मीडियावर टीकेची झोड
क्रिती (Kriti Sanon) आणि ओम राऊत (Om Raut) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आता क्रिती आणि ओम राऊत हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  Read More
Adipurush: 'तिरुपतीची शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जा...'; गुडबाय किसच्या वादादरम्यान क्रितीची पोस्ट
Adipurush:  क्रितीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार


Actress Sulochana:  ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana) यांच्या पार्थिवावर उद्या, 5 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सुलोचना दीदी यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park)  येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  


Shark Tank India 3 : 'शार्क टँक इंडिया 3' लवकरच होणार सुरू 


Shark Tank India Season 3 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता या कार्यक्रमाचं नवं प्रर्व अर्थात 'शार्क टॅंक इंडिया 3' (Shark Tank India 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. देशभरातील उद्योगकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे. 


Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचं निधन


Aamir Raza Husain Passed Away : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 


आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain Passed Away) यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी झाला. आमिर यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. अजमेरमध्ये शिक्षण घेत असतानाचा त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. आमिर राज यांनी 'बाहुबली' 'आरआरआर' या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.