IND vs AUS Adelaide Test : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात आतापर्यंत दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने सराव सामनाही जिंकला आहे. टीम इंडियाने पंतप्रधान इलेव्हनचा 6 विकेटने पराभव केला. आता मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन जवळपास फिक्स झाली आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंची जागा निश्चित झाली आहे. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासोबतच शुभमन गिलच्या नावाचाही समावेश आहे.
कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळला नव्हता. त्यावेळी तो मुंबईत होता. मात्र आता त्याने पुनरागमन केले आहे. त्यामुळे रोहितचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होणार आहे. रोहितसोबत गिलही पुनरागमन करू शकतो. दुखापतीमुळे शुभमन पहिली कसोटी खेळू शकला नव्हता. आता त्याने पण पुनरागमन केले आहे. सराव सामन्यात गिलने 50 धावांची खेळी केली. यादरम्यान 7 चौकार मारले.
हर्षित राणाची जागा जवळपास निश्चित
दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षित राणाचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सराव सामन्यात त्याने घातक गोलंदाजी केली होती. त्याने 6 षटकात 44 धावा देत 4 बळी घेतले. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही राणाने आपली ताकद दाखवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने 3 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने 1 बळी घेतला. त्यांच्यासोबत वॉशिंग्टन सुंदरलाही मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते.
ॲडलेड कसोटीतून कोण जाणार बाहेर?
गिल आणि रोहितच्या पुनरागमनामुळे दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागू शकते. त्यापैकी पहिले नाव देवदत्त पडिक्कल यांचे आहे. पर्थ कसोटीत तो विशेष काही करू शकला नाही. ध्रुव जुरेललाही ब्रेक दिला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
हे ही वाचा -
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत रोहित शर्मा दिसणार नव्या भूमिकेत, कर्णधाराचा मोठा निर्णय