Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक आई होणार; बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 16 Sep 2023 07:08 PM
Majha Katta Atul Parchure : कर्करोगाला भिडले, संकटांना गाढले; अतुल परचुरे, डॉ. देशपांडेंनी अचंबित कहाणी 'माझा कट्ट्या'वर उलगडली
Atul Parchure : अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात केली असून त्यांच्या या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी 'माझा कट्ट्या'वर उलगडली आहे. Read More
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक आई होणार; बेबी बंपचा फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
Rubina Dilaik Pregnant : अभिनेत्री रुबिना दिलैक आई होणार आहे. Read More
Vishakha Subhedar : "हो..आहे वजनदार, पण..."; वजनावरुन डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर
Vishakha Subhedar : वजनावरुन डिवचणाऱ्यांना विनोदवीर विशाखा सुभेदारने सडेतोड उत्तर दिलं आहे. Read More
Santosh Juvekar : 'मोरया' सिनेमा मिळणं हे बाप्पाचं माझ्यावर असलेलं प्रेम : संतोष जुवेकर
Kalavantancha Ganesh : 'मोरया' सिनेमा मिळणं हे बाप्पाचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे, असं अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) म्हणाला आहे. Read More
Chinmay Mandlekar : शिवरायांचा गेटअप केल्यानंतर सेल्फी देण्यास चिन्मय मांडलेकर नकार देतो; म्हणाला...
Chinmay Mandlekar : छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना अभिनेता चिन्मय मांडलेकर काही नियम पाळतो. Read More
Shah Rukh Khan : शाहरुखसाठी काहीही...; 'Jawan' पाहायला चक्क व्हेंटिलेटरवर असताना थिएटरमध्ये गेला चाहता
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा पाहायला व्हेंटिलेटरवर असणारा त्याचा चाहता थिएटरमध्ये गेला आहे. Read More
Mumbai : 200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणी सौरभ चंद्रकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी
Mumbai : 200 कोटींच्या लग्न खर्च प्रकरणी सौरभ चंद्रकरविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. Read More
Disha Patani : दिशा पटानीच्या प्रेमात वेडा झाला बॉयफ्रेंड; एलिक्सिकने अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला हातावर
Disha Patani Rumoured Boyfriend Tattoo : दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडने त्याच्या हातावर अभिनेत्रीच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.