Hi Nanna Twitter Review: मृणाल ठाकूर आणि नानीचा 'हाय नन्ना' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणतायत, 'हा मास्टरपीस आहे'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 07 Dec 2023 06:08 PM
Hi Nanna Twitter Review: मृणाल ठाकूर आणि नानीचा 'हाय नन्ना' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणतायत, "हा मास्टरपीस आहे"
Hi Nanna Twitter Review:'हाय नन्ना' या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटामधील नानी आणि मृणालच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. Read More
Animal Movie: रणबीरच्या "लीक माय शू" डायलॉगबाबत 'अॅनिमल' मधील तृप्ती डिमरीनं सोडलं मौन, म्हणाली, "मला असे सांगितले तर मी..."
अॅनिमल (Animal) चित्रपटामधील रणबीरच्या (Ranbir Kapoor) 'लीक माय शू' या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले. अशतच आता या डायलॉगवर 'अॅनिमल' चित्रपटामधील अभिनेत्री तृप्ती डिमरीनं (Tripti Dimri) मौन सोडलं आहे. Read More
Prasad Khandekar: हास्यजत्रेतील प्रसाद खांडेकरचा मुद्दा विधानसभेत गाजला, फडणवीस म्हणाले, गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करु
प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) एकदा येऊन तर बघा (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. Read More
Fighter Teaser Release Date Aanounced: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार दीपिका आणि हृतिकच्या 'फायटर'चा टीझर
Fighter Teaser Release Date: 'फायटर' या चित्रपटामधील हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचा लूक काही दिवसांपूर्वी रिव्हिल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. Read More
Kaun Banega Crorepati 15: "मला सोपे प्रश्न विचारा कारण..."; केबीसीच्या मंचावर शाहरुखच्या लेकीनं बिग बींना केली रिक्वेस्ट

Kaun Banega Crorepati 15: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15)  या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये द आर्चीज  (The Archies) या चित्रपटामधील कलाकार हॉटसीटवर दिसणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तसेच शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात एन्ट्री करत आहे. केबीसीच्या एपिसोडमध्ये द आर्चीज या चित्रपटातील कलाकार हे बिग बी यांच्यासोबत   मजेदार विषयांवर गप्पा मारताना दिसणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Animal Box Office Collection: बाहुबली, पठाण अन् जवानला टाकलं मागे; 'अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, सहाव्या दिवशी केली एवढी कमाई

Animal Box Office Collection: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)  'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अॅनिमल चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील काही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात अॅनिमल या चित्रपटाचं सहाव्या दिवसाचं कलेक्शन...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khurchi Teaser Out: आता सुरु झालंय 'खुर्ची'चं महायुद्ध; राकेश बापट आणि अक्षय वाघमारेच्या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज
खुर्ची (Khurchi) या चित्रपटात अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Animal: "अशा चित्रपटात काम करु नको, मला पाहवत नाही"; अॅनिमल पाहिल्यानंतर बॉबी देओलच्या आईनं अशी दिली रिअॅक्शन
Animal movie: एका मुलाखतीमध्ये बॉबी देओलनं (Bobby Deol) अॅनिमल (Animal) चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या आईनं दिलेल्या रिअॅक्शनबद्दल सांगितलं आहे. Read More
Animal Box Office Collection: बाहुबली, पठाण अन् जवानला टाकलं मागे; 'अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, सहाव्या दिवशी केली एवढी कमाई
Animal Box Office Collection: अॅनिमल चित्रपटानं सहाव्या दिवशी देखील काही चित्रपटांचे रेकॉर्ड्स तोडून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात अॅनिमल या चित्रपटाचं सहाव्या दिवसाचं कलेक्शन... Read More
Kaun Banega Crorepati 15: "मला सोपे प्रश्न विचारा कारण..."; केबीसीच्या मंचावर शाहरुखच्या लेकीनं बिग बींना केली रिक्वेस्ट
Kaun Banega Crorepati 15: Read More
Aishwarya-Abhishek Love Story: ऐश्वर्यानं अभिषेकच्या आधी झाडीसोबत केलं लग्न?
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांची लव्हस्टोरी हटके आहे.  जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.