एक्स्प्लोर

Aishwarya-Abhishek Love Story: ऐश्वर्यानं अभिषेकच्या आधी झाडासोबत केलं लग्न? अमिताभ बच्चन म्हणाले...

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांची लव्हस्टोरी हटके आहे.  जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल...

Aishwarya-Abhishek Love Story: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे. ऐश्वर्यानं बॉलिवूडमध्ये  विशेष ओळख निर्माण केली आहे.  अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांची लव्ह स्टोरी हटके आहे.  जाणून घेऊयात अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकथेबद्दल...

पहिली भेट


1997 मध्ये जेव्हा ऐश्वर्या  ही 'और प्यार हो गया'  या चित्रपटात अभिषेकचा मित्र बॉबी देओलसोबत काम करत होता तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एकदा भेट झाली होती. 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या हे भेटले होते. दोघांनी  ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती.  तेव्हा ऐश्वर्या ही सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि 2002 मध्ये अभिषेकचे करिश्मा कपूरसोबत लग्न होणार होते. पण, काही कारणास्तव करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न होऊ शकले नाही.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पडले प्रेमात (Aishwarya Rai And Abhishek Bachchan Love Story)

ऐश्वर्या आणि सलमान खानचा ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या ही विवेक ओबेरॉयच्या प्रेमात पडली होती. पण त्यांचे देखील काही कारणांमुळे ब्रेकअप झाले. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकमेकांच्या प्रेमात पडले.2006 मध्ये  ऐश्वर्या आणि अभिषेकला खूप वेळ एकत्र घालवण्याची संधी मिळाली. त्यावेळी 'उमराव जान' व्यतिरिक्त दोघेही 'गुरू' आणि 'धूम 2' या चित्रपटांमध्ये  एकत्र काम करत होते. ऐश्वर्याच्या प्रेमात पडलेल्या अभिषेकने अखेर तिला लग्नासाठी प्रपोज केले.

बाल्कनीत केले प्रपोज

अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी न्यूयॉर्कमध्ये  असताना हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभी राहायचो आणि विचार करायचो की एक दिवस मी तिच्याशी लग्न करू शकले तर किती छान होईल." न्यूयॉर्कमधील त्याच हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकनं ऐश्वर्याला नेले आणि लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर ऐश्वर्यानं होकार दिला. 

अभिषेकच्या आधी ऐश्वर्यानं झाडासोबत केलं लग्न?

 न्यूयॉर्कवरुन दोघेही मुंबईला परतले, तेव्हा 14 जानेवारी 2007 रोजी त्यांनी लग्न केले. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्यानं एका झाडासोबत लग्न केलं, अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. त्या काळात असं म्हटलं जात होतं की, एका प्राचीन विधीमध्ये दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्यानं एका झाडाशी लग्न झालं होतं.  यासर्व चर्चांवर 2007 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितलं,  " ते झाड कुठे आहे? कृपया मला ते दाखवा. ज्याच्यासोबत तिने लग्न केले आहे तो माझा मुलगा आहे.  तुम्हाला अभिषेक झाड आहे असं वाटतं का?." 2016 मध्ये अभिषेकनं ट्वीट केलं होतं, "आणि फक्त रेकॉर्डसाठी, आम्ही अजूनही हे झाड शोधत आहोत" 

इतर महत्वाच्या बातम्या:

Aishwarya-Abhishek Love Story: चित्रपटाच्या सेटवर पडले प्रेमात; बाल्कनीत केले प्रपोज; अशी आहे ऐश्वर्या आणि अभिषेकची प्यारवाली लव्हस्टोरी

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
Rajkumar Rao on CJP Protest: 'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण
Shahrukh Khan on CJP: सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
Embed widget