(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhukbhulaiyya 3 vs Singham again: रिलिजपूर्वीच 'भुलभूलैय्या 3' अन् 'सिंघम अगेन'ची टक्कर, टिकीट बुकींग झाल्या होल्ड, कारण काय?
दिवाळीच्या मुहूर्तावर भूलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेन हे बॉलिवूडचे दोन चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलिज होणार आहेत.
Bhool Bhulaiyaa 3 vs Singham Again: सध्या बॉलिवूडमध्ये भूलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगणचा सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या ३ या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये एकमेकांसमोर येणार आहेत. दोन्ही चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगली असून या चित्रपटांच्या रिलिजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रेक्षक कोणत्या चित्रपटाकडे वळणार यासोबत कोणत्या चित्रपटाचं प्रीबुकींग अधिक झालं? कोणत्या सिनेमाला किती स्क्रीन मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान जसजसा रिलिज डे जवळ येतोय तशी पडद्यावरील ही टक्कर अधिक जोरकस होऊ लागली आहे.
भूलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेनच्या प्रीबुकींगवरून वाद?
दिवाळीच्या मुहूर्तावर भूलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेन हे बॉलिवूडचे दोन चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलिज होणार आहेत. दरम्यान जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी स्क्रीन खरेदी करत असतात. या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आता केवळ एक आठवडा शिल्लक राहिला असून आता आगाऊ बुकिंग बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
मिडिया रिपोर्टस् नुसार भूलभुलैय्या 3 आणि सिंघम अगेनचे आगाऊ बुकिंग थांबवण्यात आले आहे. दोन चित्रपटांच्या स्क्रीन वाटपाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत कोणीही तिकीट काढू शकणार नाही. इंडिया.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कॉम्प्लेक्सचे सिनेमा व्यवस्थापक कुमार अभिषेक यांनी या चित्रपटांमधील स्क्रीनबाबत अजूनही वाद सुरु आहेत. दोघेही मागे हटायला तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत स्क्रीन वाटपाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तिकीटविक्री ठप्प राहणार असल्याचं सांगण्यात येतंय.
दौन्ही चित्रपटांची किती प्री कमाई किती झाली?
मिडिया रिपोर्टनुसार, सिंघम अगेनने प्रीसेल्समध्ये विशेषत: UAE मार्केटमध्ये भुलभूलैय्या 3 ला मागे टाकल्याचं सांगण्यात येत आहे. क्रॉप ड्रामाने याआधीच VOX सिनेमाजमध्ये 64 शो लावत 66 लाख रुपये कमावले आहेत. त्यापैकी 505 तिकीटे आताच विकली गेली आहेत. तर भुलभूलैय्या 3 च्या तुलनेत सिंघम अगेन आघाडीवर असल्याचं समजतंय. दरम्यान, सिंघम अगेनची सिंगल डे क्षमता हेी ५४ ते ५८ कोटींच्या घरात असून भुलभूलैय्या 3 ची हाऊसफूल क्षमता 44 ते 46 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.