एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला निवडणूक आयोगाचा दणका, निवडणूक काळात चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाला निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाला निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली असल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करता येणार नाही. हा चित्रपट उद्या(गुरुवार, 11 एप्रिल)हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता.
'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट निवडणुकीच्या तोंडावर प्रदर्शित करणे आचारसंहितेचा भंग ठरेल, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. याप्रकरणी विरोधकांनी या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे म्हणत विरोधकांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करु नये, असे आदेश दिले आहेत.
विरोधकांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर काल (09 एप्रिल) सुनावणी झाली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले होते. तसेच कोर्टाने याप्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते. त्यामुळे आज निवडणूक आयोगाला याप्रकरणी निर्णय घ्यावा लागला.
दरम्यान, आज सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'यू' सर्टिफिकेट देत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला होता. परंतु निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement