Ekta Kapoor: XXX वेब सीरिज प्रकरण; एकता कपूर आणि शोभा कपूर यांना पाटणा उच्च न्यायालयाकडून दिलासा
एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) या दोघींना मंगळवारी (18 ऑक्टोबर) पाटणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
Ekta Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध सीरिअल आणि वेब सीरिज निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्या विरोधात बेगुसराय कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. या प्रकरणी दोघींना मंगळवारी (18 ऑक्टोबर) पाटणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हे अटक वॉरंट XXX या वेब सीरिजच्या सीझन 2 साठी जारी करण्यात आले आहे. पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सत्यव्रत वर्मा यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना आता तक्रारदार शंभू कुमार यांना पुढील कार्यवाहीसाठी नोटीस बजावली आहे.
काय आहे प्रकरण?
XXX वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्यांबाबत 2021 मध्ये बेगुसराय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाला सांगण्यात आले आहे की, एकता कपूरच्या या वेब सीरिजमध्ये देशाच्या सैनिकाचा एक आक्षेपार्ह सिन आहे. वेब सीरिजमधील काही दृश्यांबाबत शंभू कुमार यांनी बेगुसराय कोर्टात केस दाखल केली होती.
राजीव कुमार यांच्या न्यायालयामार्फत हा खटला विकास कुमार यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला आणि तेथून त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले. पाटणा उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील वाय.व्ही.गिरी आणि अधिवक्ता निखिल कुमार अग्रवाल यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. उच्च न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांना दिलासा देताना त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देत कनिष्ठ न्यायालयात तक्रारकर्त्याला नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. तक्रारदाराने बेगुसराय न्यायालयात एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध कलम 500 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
न्यायालयाने एकताला फटकारले होते
‘ट्रिपल एक्स’ या वेबसिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला फटकारले होते. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने म्हटलं की, काही तरी करायला हवं. आपण या देशातील तरुण पिढीचे मानसिकता दूषित करत आहात. ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. OTT सामग्री सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कशा प्रकारचे पर्याय देत आहात? याशिवाय तुम्ही तरुणांचे मनं प्रदूषित करत आहात, असं कोर्टानं म्हटलं.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला झापलं; म्हटलं, 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात'