एक्स्प्लोर

एकदम सिंगल आहे! हरलीनसोबत ब्रेकअपची विकी कौशलची कबुली

काही दिवसांपूर्वी हरलीनच्या 'सॅड इन्स्टाग्राम पोस्ट्स' आणि विकीला तिने अनफॉलो केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विकी-हरलीनच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या

मुंबई : भारतातील महिला चित्रपट रसिकांचा 'नॅशनल क्रश' अशी ख्याती असलेला अभिनेता विकी कौशलचं ब्रेकअप झालं आहे. सध्या 'एकदम सिंगल' असल्याचं विकीने कबूल केलं आहे. त्यामुळे हरलीन सेठीसोबतच्या कथित प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या वर्षभरात विकी कौशलने चांगलंच व्यावसायिक यश कमावलं. संजू, उरी : द सर्जिकल स्ट्राईक यासारख्या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवतानाच प्रेक्षकांची वाहवासुद्धा मिळवली. त्यासोबत 'लस्ट स्टोरीज, लव्ह पर स्क्वेअर फूट' यासारख्या वेब सीरीजही चर्चेत होत्या. त्याचवेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही काहीतरी शिजत असल्याचा सुगावा चाणाक्ष प्रेक्षकांना लागला. विकी हा समस्त तरुणींचा 'हार्टथ्रोब' असल्यामुळे तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं कळताच अनेकींचा 'हार्टब्रेक'ही झाला खरा. मात्र हरलीनसोबतची त्याची जोडीही अनेकांच्या पसंतीस उतरली होती. 'कॉफी विथ करण'च्या एपिसोडमध्ये विकीने आपण डेटिंग करत असल्याचं संकेत दिले. दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली कधी दिली नसली, तरी 'उरी'च्या यशानंतर त्याने हरलीनसोबतचे फोटो शेअर करुन यावर शिक्कामोर्तबच केलं.
विकी कौशलसोबतच्या रिलेशनशीपवर हरलीनकडून शिक्कामोर्तब?
हरलीन सेठीने यापूर्वी काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. 'अल्टबालाजी'च्या 'ब्रोकन बट ब्यूटिफूल' या वेब सीरिजमध्येही हरलीन विक्रांत मस्सीसोबत झळकली होती.
View this post on Instagram
 

High Sir! #URI

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi) on

काही दिवसांपूर्वी हरलीनच्या 'सॅड इन्स्टाग्राम पोस्ट्स' आणि विकीला तिने अनफॉलो केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विकी-हरलीनच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. भूमी पेडणेकर आणि कतरिना कैफशी जवळीक साधल्यामुळे विकीचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं जाऊ लागलं.
View this post on Instagram
 

LACK OF VANITY They say beauty is skin deep How many of us actually believe it? On bloated days, with scarred faces Do we ever truly feel it? Her flawless skin is perfection Her body needs no correction Then why am I to deal with these ice-pit scars? Why isn't age catching up in her chart of stars? Pcod is the new lifestyle Face filters the new fad Sad is the new mental state Insta followers pretty much decide our fate So is it vanity or the lack of it? Is it constant comparisons or the emptiness within? Botox and fillers, threads and peels Laser and facials they just won't heal. So in a world full of pretense, accept yourself Project what's real, what's beneath those fears Surrender, don't wonder, don't stop, don't pause Captivate that mind, Lady! You're the boss. #happywomensday #loveyourself #acceptance Photo credit: @amitverma_in

A post shared by Harleen Sethi (@itsharleensethi) on

एका पुरस्कार सोहळ्यात विकीला रिलेशनशीप स्टेटसबद्दल छेडलं असता 'हो तर, एकदम सिंगल आहे आता, बघा... एकटा...' असं उत्तर त्याने दिलं. 'सिंगलचा मिंगल होण्याची इच्छा आहे का?' हा प्रश्न मात्र त्याने मिश्किल उत्तर देत टोलवून लावला.

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget