![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dunki Vs Salaar : शाहरुख की प्रभास? बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? तुम्हाला काय वाटतं?
Dunki Vs Salaar Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज आहेत.
![Dunki Vs Salaar : शाहरुख की प्रभास? बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? तुम्हाला काय वाटतं? Dunki Vs Salaar Advance Booking Shah Rukh Khan Prabhas Bollywood Movie Entertainment Latest Update Know Details Dunki Vs Salaar : शाहरुख की प्रभास? बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? तुम्हाला काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/20/918a6c092d465e4e6d8e32e53a0a908f1703053813092254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dunki Vs Salaar Advance Booking : डिसेंबर महिन्यात रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हे सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता वर्षाच्या शेवटीदेखील शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार असून दोन्हीची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.
शाहरुख खानचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा 2023 च्या शेवटी अनेक रेकॉर्ड करणार आहे. किंग खानच्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. तर लगेचच दुसऱ्या दिवशी प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'डंकी'चं अॅडव्हान्स बुकिंग जाणून घ्या... (Dunki Advance Booking)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'डंकी'चे देशभरात 3 लाख 64 हजार 487 तिकीट विकले गेले आहेत. त्यामुळे रिलीजआधीच ओपनिंग डेची 'डंकी' या सिनेमाने 10.39 कोटींची कमाई केली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा 35 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन करू शकतो. 'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी यांनी सांभाळली आहे. याआधी त्यांनी '3 इडियट्स', 'पीके','संजू' सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 'डंकी' हा कौटुंबिक सिनेमा असून या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
'सालार'चं अॅडव्हान्स बुकिंग किती? (Salaar Advance Booking)
'सालार'चे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 3 लाख तिकीट विकले गेले आहेत. या सिनेमाने आतापर्यंत 10 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'सालार'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 4,16,883 तिकीटांची विक्री केली आहे. त्यामुळे प्रभासचा सालार बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करण्यासाठी सज्ज आहे.
'सालार' या सिनेमात प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन आणि शरण शक्ति हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नीलने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दुसरीकडे 'डंकी' या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता 'सालार' आणि 'डंकी'मध्ये बॉक्स ऑफिस कोण गाजवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वर्षाच्या शेवटी सालार आणि डंकी हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांचं धमाकेदार मनोरंजन करणार आहेत. या दोन्ही सिनेमांत बॉक्स ऑफिस कोण गाजवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ते 'Dunki'; शाहरुख खान अन् ट्रेनचं खास कनेक्शन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)