Shah Rukh Khan : 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ते 'Dunki'; शाहरुख खान अन् ट्रेनचं खास कनेक्शन
Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि ट्रेनचं खास कनेक्शन आहे. त्याच्या अनेक सिनेमांचा ट्रेन महत्त्वाचा भाग आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'डंकी'च्या टीझर आणि ट्रेलरमध्ये किंग खानची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली आहे. यात किंग खान ट्रेनमधून उतरताना दिसत आहे. शाहरुख खान आणि ट्रेनचं नातं खूप जुनं आहे. ट्रेनचा प्रवास दाखवणारे किंग खानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत.
दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे
शाहरुख खान आणि काजोलचा 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' अर्थात DDLJ हा प्रेक्षकांचा ऑल टाइम फेव्हरेट सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुख चालत्या ट्रेनमधून काजोलचा हात पकडताना दिसत आहे.
चेन्नई एक्सप्रेस
चेन्नई एक्सप्रेसमध्येही ट्रेनचा सीन आहे. या सिनेमात शाहरुख चालत्या ट्रेनमध्ये दीपिकाचा हात पकडताना दिसत आहे.
जवान
शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. या सिनेमातील एका सीनमध्ये शाहरुख ट्रेनमधील प्रवाशांसोबत बोलताना दिसत आहे.
कुछ कुछ होता है
करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमातील काजोल आणि किंग खानची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
रावन
शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला नेहमीच ट्रेनमध्ये रोमान्स करताना पाहिलं आहे. रावन या सिनेमातील शाहरुखचा अॅक्शन सीन खूपच कमाल आहे. त्याच्या ट्रेनमधील अॅक्शन सीक्वेंसने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जब तक है जान
यश चोप्राचा जब तक है जान हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील इश्क शावा हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. कतरिना आणि एसआरके ट्रेनमध्ये रोमान्स करताना दिसून आले होते.
मैं हू ना
फराह खानचा एवरग्रीन सिनेमा 'मै हू ना' हा ठरला होता. या सिनेमात किंग खानची रेल्वे स्टेशनवर एन्ट्री झालेली दिसून आली.
दिल से
दिल से या सिनेमातील छैया छैया हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या गाण्यात शाहरुख खान चाहत्या ट्रेनमध्ये मलायका अरोरासोबत थिरकताना दिसून आला.
शाहरुख खान आणि ट्रेनचं खास कनेक्शन आहे. ट्रेन जर त्याच्या सिनेमाचा भाग असेल तर त्याचा तो सिनेमा सुपरहिट होतोच. त्यामुळे ट्रेनचे सीन्स करण्यावर त्याचा अधिक भर आहे. आता शाहरुखच्या आगामी 'डंकी' या सिनेमातही ट्रेनचा सीन पाहायला मिळणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या