एक्स्प्लोर

'गर्ल्स' सिनेमाच्या पोस्टरवरुन वाद, डॉ. सलील कुलकर्णी यांच्याकडून फेसबुकवर निषेध

मराठी सिनेविश्वात खूप नवनवे विषय हाताळले जाता आहेत. मराठी प्रेक्षकांनीही या विषयांचं स्वागत केलं आहे. केवळ कौटुंबिक नव्हे, तर कॉलेजवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठीही बॉईज, टकाटक सारखे सिनेमे येऊ लागले आहेत.

गर्ल्स सिनेमाचं दुसरं पोस्टर आलं आणि चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरवर 'आयुष्यावर बोलू काही' असं लिहिलेला टी-शर्ट घातलेली एक तरूणी असभ्य हावभाव करते आहे. यावरून डॉ. सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी सिनेविश्वात खूप नवनवे विषय हाताळले जाता आहेत. मराठी प्रेक्षकांनीही या विषयांचं स्वागत केलं आहे. केवळ कौटुंबिक नव्हे, तर कॉलेजवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठीही बॉईज, टकाटक सारखे सिनेमे येऊ लागले आहेत. बॉइजला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आता त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'गर्ल्स' हा सिनेमा बनवला आहे. यात तीन मुलींची गोष्ट असल्याचं या सिनेमाच्या पोस्टरवरून वाटतं. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पहिलं पोस्टर आलं. मात्र आज दुसरं पोस्टर आल्यावर मात्र जरा कल्लोळ उडाला आहे. या नव्या पोस्टरमध्ये सिनेमातली एक अभिनेत्री दिसते. त्यात तिने 'आयुष्यावर बोलू काही' असं लिहिलेला टी शर्ट घातला आहे. तर #FamilySucks असंही यावर लिहीलं आहे. हा टी-शर्ट घालून तिने हावभाव केले आहेत. हे पोस्टर सकाळी आलं आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांना सुरूवात झाली. आयुष्यावर बोलू काही टी-शर्ट घालून या मुलीने केलेल्या हावभावाचा पहिला निषेध नोंंदवला आहे तो डॉ. सलील कुलकर्णी यांनी. महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना संदीप खरे आणि सलील यांनी आपल्या या कवितांच्या कार्यक्रमाने वेड लावलं आहे. आजही याचे कार्यक्रम देशा-परदेशात होताना दिसतात. सलील यांनी मात्र या पोस्टरचा निषेध केला आहे. फेसबुकवर यासंबंधीची पोस्ट त्यांनी शेअर केली असून त्यात या पोस्टरचा निषेध करण्यात आला आहे. 'आई वडील भाऊ बहीण अशा नात्यांना समोर ठेवून आम्ही एक अत्यंत हळवा कार्यक्रम केला. जवळपास 16 वर्षं आम्ही हा कार्यक्रम करतोय. पण त्याचा हा असा अपमान नींदनीय आहे. मी, संदीप आणि या कार्यक्रमाची सर्व टीम याचा निषेध करतो,' अशा आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे. या पोस्टचं अनेकांनी समर्थन केलं आहे. त्याचवेळी गर्ल्स सिनेमाच्या टीमचं यावरचं म्हणणं काय ते मात्र अद्याप कळलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget