Dr. Mohan Agashe : 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर साजरा झाला डॉ. मोहन आगाशे यांचा वाढदिवस; कलाकारांनी दिल्या सुरेश शुभेच्छा
Dr. Mohan Agashe : डॉ. मोहन आगाशे यांचा 75 वा वाढदिवस 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर साजरा झाला आहे.
Dr. Mohan Agashe : 'सूर नवा ध्यास नवा' (Sur Nava Dhyas Nava) या लोकप्रिय गाण्याच्या कार्यक्रमाचे पाचवे पर्व आजपासून सुरू होत आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या मंचावर डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe) यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला आहे. कलर्स मराठीने यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कलर्स मराठीने 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. मोहन आगाशे यांना वाढदिवस साजरा करून एक खास भेट दिली आहे. 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरम्यान महेश काळे, अवधुत गुप्ते, सुमित राघवन आणि अभिनेत्री स्पृहा जोशी मंचावर उपस्थित होते.
View this post on Instagram
डॉ. मोहन आगाशे यांनी पुण्यातील बी.जे, मेडिकल महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी मानसशास्त्र विषयात एम.डी.ची पदवी मिळवली. ते मानसोपचाराचेदेखील प्राध्यापक होते. तसेच त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकोफार्माकोलॉजी या क्षेत्रातदेखील काम केलं आहे. मालिका, सिनेमांसह त्यांनी मराठी रंगभूमीदेखील गाजवली आहे.
सजणार सुरांची मैफिल
15 ते 35 वयोगटातील 'सूर नवा ध्यास नवा'च्या या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल 16 स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. आता दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची ही खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे.
संबंधित बातम्या