Don 3 First Look: '11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे...'; डॉन-3 चा टीझर रिलीज, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत
फरहान अख्तरने डॉन 3 (Don 3) चित्रपटाचा टीझर रिलीज नुकताच शेअर केला आहे. या टीझरमध्ये रणवीर हा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.
Don 3 First Look: डॉन या चित्रपटाच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी रुपेरी पडद्यावर डॉनची भूमिका साकारली. आता बॉलिवूडला नवा डॉन मिळाला आहे. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा डॉन-3 (Don 3) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. डॉन आणि डॉन 2 चे दिग्दर्शन करणाऱ्या फरहान अख्तरने डॉन 3 चित्रपटाचा टीझर नुकताच शेअर केला आहे. या टीझरमध्ये रणवीर हा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे.
फरहान अख्तर आणि रणवीर सिंह यांनी डॉन 3 चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'A New Era Begins'
"तुम तो हो जानते हो,जो मेरा नाम है. 11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, पर पकड़ पाया है मुझको कौन? मैं हूं डॉन." हा रणवीर सिंहचा डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो. डॉन-3 चित्रपटाच्या टीझरमधील रणवीर सिंहचा स्वॅग आणि स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पाहा टीझर:
View this post on Instagram
रणवीर झाला बॉलिवूडचा तिसरा डॉन
अमिताभ बच्चन यांनी 1978 मध्ये रिलीज झालेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित डॉन या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेल्या 2006 मध्ये रिलीज झालेल्या डॉन चित्रपटात शाहरुख खाननं डॉनची भूमिका साकारली.
2011 मध्ये रिलीज झालेल्या डॉन 2 चित्रपटामध्ये देखील शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता डॉन-3 चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार असून तो आता बॉलिवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.
रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83 यांसारख्या हिट चित्रपटांमधील रणवीरच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता रणवीरच्या डॉन-3 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
संबंधित बातम्या