एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पहिल्यावहिल्या डोंबिवली फिल्म फेस्टिव्हलचं 11-12 जानेवारी रोजी आयोजन
11 आणि 12 जानेवारी, 2019 असे दोन दिवस हा फिल्म फेस्टिव्हल रंगणार आहे.
मुंबई : चित्रपट हे माध्यम नेहमीच समाजाचं प्रतिबिंब ठरलं आहे. आपल्या अवतीभोवती नेहमीच एक कलाकार असतो ज्यात अभिनयाची, लिखाणाची आणि दिग्दर्शनाची कला असते. त्याच कलेला वाव देण्यासाठी 'JMF MOVIES' तर्फे प्रथमच डोंबिवली इंटरनॅलनल मूव्ही फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.
11 आणि 12 जानेवारी, 2019 असे दोन दिवस हा फिल्म फेस्टिव्हल रंगणार आहे. 'JMF MOVIES' ची IMPPA आणि मराठी चित्रपट महामंडळ मध्ये नोंदणी झाली आहे. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केला आहे.
बहुतांश चित्रपट विभाग हा मुंबईच्या पश्चिम विभागात आहे. त्यामुळे मध्य विभागात राहणाऱ्या होतकरु कलाकारांना पुरेपूर संधी मिळत नाही आणि त्यांची कला सीमित होऊन जाते. म्हणूनच ही संकल्पना उभी केल्याचं 'JMF MOVIES' सांगितलं.
अनेक होतकरु कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी यामार्फत उपलब्ध करुन देत आहोत. तसंच आपल्या देशातील लोकांना विदेशातील चांगले चित्रपट पाहायला मिळावे तसेच विदेशातील लोकांना आपले चित्रपट पाहायला मिळावी आणि त्याचं कौतुक व्हावं हाच एक उद्देश, असा दावा JMF MOVIES चा आहे.
हा फक्त एक चित्रपट महोत्सव नसून ही एक स्पर्धा सुद्धा आहे. या स्पर्धेत तुम्ही आपले फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म, डॉक्यूमेंटरी आणि फोटोग्राफी प्रदर्शित करू शकता. यासाठी कुठल्याही भाषेचं, विषयाची बंधन नाही आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांना १ लाख रुपयांपर्यंतचं बक्षीस मिळणार आहे. चित्रपट आणि प्रवेशासाठी अंतिम तारीख २० डिसेंबर २०१८ आहे, असंही आयोजकांनी स्पष्ट केलं आहे.
www.jmfmovies.com या लिंकवर प्रवेश नोंदवा
तर चित्रपट info@jmfmovies.com वर पाठवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement