![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dobaaraa Box Office collection : रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!
Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
![Dobaaraa Box Office collection : रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ! Do baaraa Box Office collection no audience for Taapsee pannu film on day 1 Dobaaraa Box Office collection : रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/27d107c021802b0fb3e76eaf657373401660963690581373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘दोबारा’ हा चित्रपट 19 ऑगस्टला रिलीज झाला. या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिवली आहे. तापसीच्या ‘दोबारा’ला काही ठिकाणी प्रेक्षकच नसल्याने शो देखील रद्द करावे लागले आहेत. तर, काही ठिकाणी केवळ 8-10 लोकांनी हा चित्रपट पाहिला. अर्थात या सगळ्याचा परिणाम आता ‘दोबारा’ चित्रपटाच्या कलेक्शनवरही होणार आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये बॉयकॉटचे वारे वाहत आहेत. कोणताही चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लोक त्याला बॉयकॉट करत आहेत. याचा परिणाम आता येणाऱ्या चित्रपटांनाही भोगावा लागणार आहे. तापसी पन्नूच्या चित्रपटालाही रिलीज पूर्वी बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला होता. पहिल्याच दिवशी चित्रपटाची ही अवस्था पाहून या चित्रपटाने केवळ 50 ते 60 लाखांची कमाई केली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक
‘दोबारा’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातील तापसी पन्नूच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे, तर त्याची कथाही काहीशी हटके आहे. 'दोबारा' हा स्पॅनिश चित्रपट 'मिरेज'चा अधिकृत रिमेक आहे. ‘मिरेज’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनी यापूर्वी 'मनमर्जियां' चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात विकी कौशल आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. दुसरीकडे, तापसीने 'दोबारा'पूर्वी पावेल गुलाटीसोबत 'थप्पड' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, सुनीर क्षेत्रपाल आणि गौतम बोस यांनी केली होती.
‘या’ चित्रपटांनाही थंड प्रतिसाद
तापसी ही बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करते. तापसीचा 'थप्पड' हा चित्रपट लॉकडाऊनच्या आधी रिलीज झाला होता. लॉकडाऊन दरम्यान, तिचे 'हसीन दिलरुबा', 'रश्मी रॉकेट' आणि 'लूप लपेटा' हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. जेव्हा निर्बंध शिथिल झाले आणि चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली, तेव्हा तापसीचा 'शाबाश मिथू' प्रदर्शित झाला. पण, त्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.
सध्या अभिनेत्री तापसी पन्नूकडे आगामी अनेक चित्रपटांची रांग लागली आहे. तापसी शाहरूख खानबरोबर ‘डंकी’ या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. तर, राजकुमार रावसोबतही ती एका चित्रपटात झळकणार आहे. तापसी राजकुमार आणि शाहरुखसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)