Disha Patani: 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' ची सात वर्षे; सुशांतच्या आठवणीत दिशा भावूक, म्हणाली, "आम्ही गुडबाय म्हणून शकलो नाही पण..."
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) हा चित्रपटाला रिलीज होऊन सात वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं दिशानं एक खास पोस्ट शेअर करुन सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Disha Patani: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) यांचा एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story) हा चित्रपट 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला रिलीज होऊन सात वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं दिशा पटानीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
दिशा पटानीची पोस्ट
दिशा पटानीनं सोशल मीडियावर एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा आणि सुशांत दिसत आहेत. दिशानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "या सुंदर प्रवासाबद्दल आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या पहिल्या चित्रपटाबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्यांनी तुम्हाला आनंद दिला आहे, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा आणि त्यांची कदर करा. पश्चात्त करण्यासाठी आयुष्य खूप कमी आहे! आम्ही गुडबाय म्हणून शकलो नाही पण मला आशा आहे की, तू आनंदी आणि शांत असशील."
दिशा पटानीनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी कमेंट करुन दिशा आणि सुशांत यांच्या एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामधील अभिनयाचं कौतुक केलं.
View this post on Instagram
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं. या चित्रपटात सुशांत आणि दिशा यांच्यासोबतच कियारा अडवाणी,अनुपम खेर,भूमिका चावला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात क्रिकेटर एमएस धोनीची स्ट्रगल स्टोरी आणि त्याच्या करिअरबाबत दाखवण्यात आलं आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. सुशांतच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: