एक्स्प्लोर
प्रख्यात दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांंचं निधन
मूत्रपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
मुंबई : प्रवाहापेक्षा वेगळ्या कलाकृतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांचं निधन झालं. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लाज्मी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्या मूत्रपिंडाच्या कर्करोगाशी झुंजत होत्या. कल्पना लाज्मी 64 वर्षांच्या होत्या.
प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित 'रुदाली' चित्रपटामुळे कल्पना लाज्मी यांना वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर 'एक पल', 'दरमियां', 'क्यों?', 'दामन' आणि 'चिंगारी' यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांतून सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून कल्पना लाज्मींनी कारकीर्द सुरु केली. आपल्या चित्रपटांतून त्यांनी स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवले.
कल्पना लाज्मी या प्रसिद्ध चित्रकार ललिता लाज्मी यांच्या कन्या, तर चित्रपट निर्माते गुरुदत्त यांच्या भाची होत्या. सुप्रसिद्ध गायक भूपेन हजारिका हे त्यांचे निकटवर्तीय होते. लाज्मी यांनी हजारिका यांच्या आयुष्यावर 'भूपेन हजारिका: अॅज आय न्यू हिम' हे पुस्तकही लिहिलं होतं.
कल्पना लाज्मींच्या आजारपणा अभिनेता आमिर खानने त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतही केली होती. बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनी कल्पना लाज्मी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement