Pathan Digital Rights : किंग खानच्या 'पठाण'चे डिजिटल हक्क कोट्यवधींत विकले; पुढील वर्षी सिनेमा होणार प्रदर्शित
Pathan Digital Rights : शाहरुख खानचा आगामी 'पठाण' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे.
Pathan Digital Rights : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathan) सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज होणार असला तरी शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. दरम्यान 'पठाण'च्या डिजिटल हक्कांची कोट्यवधींत डील झाली आहे.
शाहरुख 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. या सिनेमात शाहरुख 'ओम शांती ओम' नंतर दुसऱ्यांदा दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'पठाण'च्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या हक्कांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमसोबत 200 कोटींचा करार केला आहे.
View this post on Instagram
'पठाण' सिनेमात शाहरुख अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाशिवाय या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया, आशुतोष राणा, जॉन अब्राहम आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख जवळपास तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
संबंधित बातम्या