(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dia Mirza Vaibhav Rekhi Baby : दिया मिर्झा झाली आई, घरी नव्या पाहुण्याच्या आगमनानं उत्साहाचं वातावरण
अभिनेत्री दिया मिर्झानं एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. डिलीवरीच्या वेळी निर्माण झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे वेळेआधीच बाळाचा जन्म झाला असल्याची माहिती दिया मिर्झानं दिली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानं मुलाला जन्म दिला आहे. दिया आणि पती वैभव रेखी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दियानं मुलाचं नाव Avyaan Azaad Rekhi असं ठेवलं आहे.
अभिनेत्रीनं पोस्टमध्ये सांगितलं की, बाळाचा जन्म 14 मे रोजी झाला. प्रीमॅच्युअर डिलीवरी झाल्यामुळे देखरेखीसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. जवळपास दोन महिन्यांनी आज पोस्ट शेअर करत दिया मिर्झानं चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली.
दिया मिर्झानं सांगितलं की, "गरोदरपणात झालेल्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते. अशातच तत्काळ C-section द्वारे तिची डिलीवरी करण्यात आली. त्यामुळे वेळेआधीच बाळाचा जन्म झाला. त्यानंतर बाळाला काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दिया मिर्झा आणि वैभव रेखी आपल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच अभिनेत्रीनं सांगितलं की, बाळाचे आजी-आजोबा आणि बहिण समायराही त्याच्यासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहेत.
याच वर्षी 15 फेब्रुवारी रोजी दिया मिर्झाने वैभव रेखी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीनं वैभव रेखींसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये दिया मिर्झानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत गरोदर असल्याची गोड बातमी शेअर केली होती.
दरम्यान, दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार असल्याचं दियानं त्यावेळी सांगितलं होतं. यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :