ना रणवीर ना अक्षय खन्ना.. खरा धुरंधर तर आदित्य धर; 6 वर्षांत दोन्ही फिल्म्स सुपरहिट; Net Worth किती माहितीय?
6 वर्षात 2 चित्रपट, आणि दोन्ही ब्लॉगबस्टर ठरले. केवळ धुरंधर चित्रपटाने भारतात रिलीजच्या 18 व्या दिवशी 555. 75 कोटी कमावले.

Dhurandhar Director Aditya Dhar Net Worth: बॉलीवूडमध्ये क्वचितच काही सिनेमे येतात जे सगळ्यात कमी वेळात बॉक्स ऑफिसवर इतिहास रचतात. सध्या आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाची एकच हवा आहे. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त धुरंधरचं नाव आहे. प्रमुख भूमिकेत असणारा अभिनेता रणवीर सिंह तसेच रहमान डकैत याचा भूमिकेत अक्षय खन्नाच्या पात्राची, त्याच्या डान्सची किंबहुना या सिनेमातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतली गेली. उरी द सर्जिकल स्ट्राइक या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर दिग्दर्शक आदित्य धर धुरंधरमुळं पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आला. 6 वर्षात 2 चित्रपट, आणि दोन्ही ब्लॉगबस्टर ठरले. केवळ धुरंधर चित्रपटाने भारतात रिलीजच्या 18 व्या दिवशी 555. 75 कोटी कमावले. जगभरात चित्रपटाची कमाई 800 कोटींच्या घरात गेली आहे. धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने 2.5 कोटी रुपये कमवल्याचं सांगितलं जातं. पण तुम्हाला माहितीये का दिग्दर्शक आदित्य धर याची नेट वर्थ कितीय? चला जाणून घेऊ ..
धुरंधर दिग्दर्शक आदित्य धरची Net worth किती?
आदित्य धर हा केवळ दिग्दर्शकच नाही तर एक उत्तम लेखक आणि निर्मातादेखील आहे. उरीच्या ऐतिहासिक यशानंतर त्याच्या मानधनात लक्षणीय वाढ झाली होती. तो एका चित्रपटासाठी साधारण 8 ते 10 कोटी रुपये आकारतो असे सांगितले जाते. काही वृत्तानुसार आदित्य धर आणि त्याची पत्नी यामी गौतम हिच्यासह त्याची नेटवर्थ 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. आदित्य धरचे प्रोडक्शन हाऊस, B62 स्टुडिओ, आणि काही नव्या प्रकल्पांवर तो काम करतो.
ब्रांद्रात आलिशान घर, उंची गाड्यांचा ताफा
आदित्य धरच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल बोलायचं झाले तर, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसा न दिसणाऱ्या या दिग्दर्शकाची जीवनशैली अगदी आलिशान आहे. मुंबईतील बांद्रामध्ये त्याच एक सुंदर घर आहे. चंदीगड मध्ये एक डुप्लेक्स आहे आणि हिमाचल प्रदेशातही त्याची कौटुंबिक मालमत्ता असल्याचं सांगितलं जातं. आदित्य धरकडे उंची कार्सचा ताफा आहे. BMW X7 सारखी प्रीमियम Suv आणि आणखी दोन लक्झरी ऑडी यांचा समावेश आहे.
उरीसह धुरंधरची कमाई किती?
आदित्य धरला 2019 मध्ये उरी द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी बेस्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल यांच्यासह इतर कलाकार होते. पुरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 244 कोटी रुपयांचा गल्ला केला होता. जगभरात 340 कोटी रुपयांपर्यंत गेलेली 2019 सालची ती चौथी फिल्म ठरली होती. तर 2025 मध्ये धुरंधर ही फिल्म जगभरात 800 कोटींच्यावर पोहोचली. या चित्रपटाने सगळे रेकॉर्डस मोडले. भारतात 560 कोटींचा गल्ला या चित्रपटाने गाठलाय.























