Devendra Phadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'; तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
Devendra Phadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट भावला आहे. तसेच त्यांनी तरुणांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
Devendra Phadnavis on Swargandharva Sudhir Phadke : सुधीर फडके (Sudhir Phadke) म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, पण त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. पुष्कळ चढउतार यादरम्यान आले. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Swargandharva Sudhir Phadke) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी या चित्रपटास पसंती दर्शवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके'
भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट तमाम मराठी प्रेक्षकांना, विशेषतः तरुणांनी हा चित्रपट हमखास चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले असून ते म्हणाले, "महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असले प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार सुधीर फडके(बाबूजी) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके आता जगभरात प्रदर्शित झाला आहे. बाबूजींचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि प्रामाणिक कष्टातून आयुष्याला दिलेली उत्तुंग कामाची झळाळी या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. राष्ट्रप्रेमाचा आणि संगीत कलेचा ध्यास घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या बाबूजींना खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणून आपण सर्वानी हा चित्रपट पहावा."
View this post on Instagram
दिग्दर्शक योगेश देशपांडे याबद्दल म्हणतात,"माझ्या मनाला खूप समाधान मिळतेय. आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे, असे म्हणण्यात हरकत नाही. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे तसेच मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून देखील कलाकारांचे आणि चित्रपटाचे इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत. माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार".
संबंधित बातम्या