एक्स्प्लोर
कतरिना कैफला लग्नाचं आमंत्रण देणार नाही : दीपिका पदुकोण
दीपिकाला तिचा एक्स बॉयफ्रेण्ड रणबीर कपूरने कतरिनासाठी सोडलं होतं. याचा राग दीपिकाच्या मनात अजूनही धुमसता आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री गळ्यात गळे घालून हिंडताना दिसतात, तर काही अभिनेत्रींमध्ये विस्तवही जात नाही. कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यातला कोल्डवॉर जुनाच आहे. अद्यापही हे शीतयुद्ध शमलं नसल्याचं दीपिकाने दाखवून दिलं आहे. कतरिनाला आपल्या लग्नात बोलवणार नाही, असं दीपिकाने सांगितलं.
दीपिकाला तिचा एक्स बॉयफ्रेण्ड रणबीर कपूरने कतरिनासाठी सोडलं होतं. याचा राग दीपिकाच्या मनात अजूनही धुमसता आहे. विशेष म्हणजे दीपिकाने रणबीरसोबतही मैत्री ठेवली आहे, मात्र कतरिनासोबत पॅच अप करण्याची तिची अजिबात इच्छा दिसत नाही.
नेहा धुपियाच्या शोमध्ये दीपिकाने बहीण अनिशा पदुकोणसोबत हजेरी लावली होती. यावेळी 'से इट ऑर स्ट्रीप इट' या सेगमेंटमध्ये नेहाने दीपिकाला विचारलं, 'तू कतरिनाला तुझ्या लग्नात बोलवशील का?' नेहाला साहजिकच काहीतरी गॉसिप मिळवायचं होतं, मात्र दीपिकाच्या स्पष्टवक्त्या उत्तरामुळे तीसुद्धा क्षणभर अवाक झाली.
दीपिकाने ठामपणे 'नाही' असं उत्तर दिलं. अर्थात कतरिनाकडूनही दीपिकासाठी मैत्रीची दारं बंद झाली आहेत. करण जोहरच्या शोमध्ये कतरिनाला याबाबत छेडण्यात आलं. 'तू दीपिकाला अजूनही मैत्रीण मानतेस का?' असा प्रश्न करणने विचारला होता, त्यावर कतरिनाने मौन बाळगणंच पसंत केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
Advertisement