एक्स्प्लोर
दीपिका पदुकोणच भंसालीची 'पद्मावती'?
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा संजय लीला भंसालीच्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भंसालीच्या आगामी चित्रपटासाठी कोणाला कास्टिंग करणार, याबाबतचे विविध तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता यावर दीपिकाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
एका मुलाखतीदरम्यान दीपिकाला 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी'नंतर संजल लीला भंसालीच्या कोणत्या चित्रपटात काम करणार या संदर्भात विचारले होते. तर त्यावर तिने भंसालीसोबतच्या चित्रपटाचे सप्टेंबरपासून शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले.
या चित्रपटात दीपिका राणी 'पद्मा'च्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहला कास्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही या दोघांनीही 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात एकत्र काम केले होते.
दीपिका नुकतीच हॉलीवूडमधील XXXया चित्रपटाचे शूटिंग संपवून नुकतीच भारतात परतली. यानंतर ती आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे 'पद्मावती'च्या शूटिंगच्या कामांनाही वेग आला आहे. सोमवारी श्रेया घोषालने पद्मावती या नव्या चित्रपटातील गाणे रेकॉर्ड करण्यात आले. श्रेयाने ट्विटरवरून ही माहिती देताना भंसालीचे मुक्त कंठाने कौतुक केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement