दीपिका पदुकोणच्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं; होणारा पती देओल कुटुंबाच्या जवळचा; सोयरिक जुळवण्यात रणवीरचा महत्वाचा रोल
अनिशा आणि रोहन यांच्या नात्यामुळे पादुकोण आणि देओल कुटुंब जोडले जाणार आहेत.अनिशा सध्या तिचे आईवडील प्रकाश आणि उज्वला पादुकोण यांच्यासोबत बंगळुरूत राहते.

Anisha Padukone : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसमारंभांची लगबग, नात्यांचे नवे भावबंध आणि कुटुंबांमध्ये वाढती सोयरीक, नव्या पाहुण्याची चाहूल अशा आनंददायी घटनांची हवा तयार झाली असताना, अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या कुटुंबातही एक सुखद बातमी येत आहे. तिची धाकटी बहीण अनिशा पादुकोण (Anisha Padukone) आता लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे.
देओल कुटुंबाशी जवळचा संबंध
दीपिकाची बहीण अनिशा पादुकोण आणि तिचा मित्र रोहन आचार्य यांच्या लग्नाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. अनिशा आणि रोहन दोघेही अनेक वर्षे एकत्र आहेत, मात्र त्यांनी नातेसंबंध लाईमलाइटपासून दूर ठेवले होते. रोहन आचार्य हा दिग्गज चित्रपट निर्माते बिमल रॉय यांचा पणतू असून सनी देओलच्या सुनेचा भाऊ आहे. अनिशा आणि रोहन यांच्या नात्यामुळे पादुकोण आणि देओल कुटुंब जोडले जाणार आहेत.
सोयरिक जुळवण्यात रणवीरचा मोठा रोल
या दोघांच्या नात्यात रणवीर सिंगची भूमिका महत्त्वाची ठरल्याचं बोललं जातं. रणवीरचे आई-वडील आणि रोहनचे वडील सुमित आचार्य यांच्यात जुनी मैत्री असल्याने, त्यांच्या लग्नाबद्दल दोन्ही घरांमध्ये कोणताही विरोध नव्हता. दीपिका आणि रणवीर दोघेही रोहनला सोशल मीडियावर फॉलो करतात.
अनिशा पादुकोण व्यावसायिक गोल्फपटू आहे आणि दीपिकाच्या ‘लाइव्ह लव्ह लाफ फाउंडेशन’मध्ये ती मुख्य जबाबदारी पार पाडतेय. दुसरीकडे, रोहन आचार्य दुबईत स्थायिक असून आपल्या वडिलांसोबत कौटुंबिक ट्रॅव्हल व्यवसाय बघतो. तो चिमू आणि सुमित आचार्य यांचा मुलगा आहे. अनिशा सध्या तिचे आईवडील प्रकाश आणि उज्वला पादुकोण यांच्यासोबत बंगळुरूत राहते.
View this post on Instagram
सोहळ्याची लवकरच घोषणा होण्याची शक्यता
या दोघांच्या लग्नामुळे पादुकोण आणि आचार्य कुटुंबांत आनंदाचे वातावरण असून लवकरच या सोहळ्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाहत्यांमध्येही या नव्या नात्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. रोहनची आई चिमू आचार्य पूर्वी एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग हेड होत्या. 2002 मध्ये त्यांनी स्वतःची इव्हेंट कंपनी सुरू केली होती आणि त्यांच्या एका मोठ्या कार्यक्रमात आमिर खाननेही सहभाग घेतला होता. अनिशा आणि रोहन या दोघांनी आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवलं असलं, तरी त्यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
























