एक्स्प्लोर
दीपिकाचा नवा लूक पाहिलात काय?
कोरोना आल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री दीपिका पदुकोण घराबाहेर पडली. दीपिकाने आपला नवा लूक इन्स्टावर टाकला आहे.
लॉकडाऊन काळात सगळे कलाकार मारून मुटकून घरी बसले होते. पहिले चार महिने कलाकारांना घरी बसावं लागलंच. पण सगळी दुकानं बंद असल्यामुळे त्यांची फार पंचाईत झाली होती. त्यांची कशाला.. आपली सगळ्यांचीच. हेअर सलूनमध्ये जाण्यापासून सगळ्याचा खोळंबा झाला. म्हणून अनेक कलाकारांनी आपले केस वाढू दिले आणि मग त्यातून त्याची स्टाईल केली.
पुरूष कलाकारांची बात फक्त केसांपर्यंत होती. कारण, अनेकांचे केस वाढले तर अनेकांना केस डायही करता आले नाहीत. अनेक कलाकार त्यात आले. दिग्दर्शक, निर्माता करण जोहर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण लॉकडाऊन जसा सुटू लागला तसा कलाकार बाहेर पडला. केस काळे झाले. हेअर सलून उघडली आणि तमाम महिला कलाकारांनाही हुश्श झालं. याला अभिनेत्री दीपिका पदुकोणही अपवाद नाही.
अभिनेते परेश रावल यांची NSD च्या अध्यक्षपदी नियुक्ती
दीपिकाने आपला नवा लूक इन्स्टावर टाकला आहे. त्यात तिने आपले केस कलर केले आहेत. तिने टाकलेला फोटो पाहता ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसते आहेच. पण खबरदारीचा उपाय म्हणून तिने आपल्या चेहऱ्यावरचा मास्कही काढलेला नाहीय. तिचा हा क्लेजअप सध्या बराच व्हायरल होतोय. दीपिका बऱ्याच महिन्यांनी घराबाहेर पडली. तिच्या हेअर स्टायलिस्टनेही इन्टावर बुमरँग टाकला आहे. त्यात दीपिकाचा डाय करण्यापूर्वीचा लूक दिसतो.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंगसह अनेकांची नावं नेपोटिझम आणि अमली पदार्थ सेवनप्रकरणी येताना दिसतायत. दीपिकाचं यात अद्याप नाव नसून कंगनाने ट्विटरवरून रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल यांना खुलं आव्हान दिलं आहे. पण तिची पोस्ट आल्यानंतरही या कलाकारांपैकी कुणीच काही बोललेलं नाही. शिवाय दीपिकाही व्यक्त झाली नव्हती. बऱ्याच दिवसांनी तिने आपल्या सोशल मिडीयावर आपला फोटो पोस्ट केला. Complaint Against Kangana Ranaut | कंगना रनौतविरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement