रणवीर-दीपिकाने लग्नासाठी 15 नोव्हेंबर हा दिवस का निवडला?
रणवीर आणि दीपिका यांनी लग्नासाठी हीच तारीख का निवडली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र या दिवशी काहीतरी खास असेल याचाही शोध अनेकांकडून सुरू आहे.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे बॉलिवूडमधलं क्युट कपल लवकरच लगीनगाठ बांधणार आहे. दीपिका आणि रणवीर दोघांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंवर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. येत्या 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
मात्र रणवीर आणि दीपिका यांनी लग्नासाठी हीच तारीख का निवडली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या दिवशी काहीतरी खास असेल याचाही शोध अनेकांकडून सुरू आहे.
रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भंन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सुरू झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही.
रणवीर-दीपिका यांनी एकमेकांसोबत एकूण चार सिनेमे केले आहेत. हे सर्व चित्रपट संजय लीला भन्साळी यांचेच आहेत.
दीपिका आणि रणवीर यांचा पहिला सिनेमा 'राम-लीला' 15 नोव्हेंबर 2013 ला प्रदर्शित झाला होता. त्यामुळे ही तारीख या दोघांसाठी खास आहे. या सिनेमापासूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती. याशिवाय राम-लीला सिनेमाला पाच वर्षही पूर्ण होत आहेत. अशारीतीने पहिल्या भेटीची आठवण म्हणून हे दोघे 15 नोव्हेंबरला विवाह करत असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
— Deepika Padukone (@deepikapadukone) October 21, 2018